Home ब्रम्हपुरी आरोग्य :- बेलगाव येथील शेतकऱ्याच्या उपचारांसाठी रवींद्र शिंदे यांच्या संस्थेची मदत.

आरोग्य :- बेलगाव येथील शेतकऱ्याच्या उपचारांसाठी रवींद्र शिंदे यांच्या संस्थेची मदत.

 

स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टद्वारे एक हात मदतीचा उपक्रम सुरुच.

भद्रावती प्रतिनिधी :-

स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टद्वारे एक हात मदतीचा उपक्रम सातत्याने सुरु आहे. ट्रस्टच्या वतीने रूग्ण, गरीब, गरजु व शेतक-यांना जमेल ती मदत करण्याचे कार्य होत आहे. तालुक्यातील बेलगाव येथील श्रीकृष्ण दादाजी पिंपळकर (वय २५) या शेतक-याला मेंदुच्या आजारावरील उपचाराकरीता नुकतीच आर्थीक मदत देण्यात आली आहे.

सामाजिक कार्यकर्ते रवि शिंदे वरोरा व भद्रावती तालुक्यातील प्रत्यक्ष गावागावात फिरुन शेतक-यांवर ओढवणा-या समस्यांना जाणून घेत आहेत व त्यांना बँकेतर्फे तथा स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट द्वारे जी मदत करण्यात येइल, ती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत.
सदर कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते रवि शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्ताभाऊ बोरेकर, बेलगावचे सरपंच सुनिल आगलावे, बाळा पडवे, आत्राम व गावकरी उपस्थित होते.

Previous articleप्रेरणादायी :- आदित्य जीवने यांनी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवून वरोरा शहराची मान उंचावली.
Next articleखळबळजनक :- सासू,नणंदेने अंगावर रॉकेल टाकून विवाहितेला जिवंत जाळली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here