Home महाराष्ट्र चिंताजनक :- राज्यात दसरा दिवाळी नंतर तिसरी लॉट येणार?

चिंताजनक :- राज्यात दसरा दिवाळी नंतर तिसरी लॉट येणार?

 

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या विधानाने राज्यातील जनजीवन पुन्हा विस्कळीत होण्याची भीती.

नेटवर्क न्यूज :-

राज्यात सप्टेंबरच्या दरम्यान तिसरी लॉट येण्याचे भाकीत करणारे राज्य सरकार सप्टेंबर महिना संपण्याच्या स्थितीत असताना तिसऱ्या लॉटेची भीती नसल्याचे सांगत होती मात्र आता कोरोना रुग्णांचे आकडे स्थिर असताना तिसरी लॉट दसरा, दिवाळीनंतर येण्याची शक्यता आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. त्यामुळे राज्यातील जनतेचे सुरळीत आलेले जनजीवन पुन्हा विस्कळीत होणार असल्याचे चिन्ह दिसत आहे. दरम्यान जनतेने कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करुन काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

खरं तर राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली आहे. रुग्णसंख्या कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्व निर्बंधांमध्ये सूट देण्यास सुरुवात केली आहे. अशामध्ये आता टोपे यांनी कोरोनाबाबत राज्यातील जनतेला इशारा दिला असल्याने दसरा आणि दिवाळी नंतर तिसऱ्या लाटेची शक्यता जनतेच्या मनात धडकी भरविणारी आहे.मात्र तिसऱ्या लॉटेच्या पार्श्वभूमीवर आपण विशेष लसीकरण करत आहोत. जेणेकरून आरोग्यावर जास्त गंभीर परिणाम होणार नाही, असं टोपे यांनी सांगितलं.

महाराष्ट्रात लसीकरणासाठी ‘मिशन कवच कुंडल’ मोहिम.

महाराष्ट्राचा देशाच्या लसीकरणात मोठा सहभाग असावा. त्यासाठी आम्ही ८ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत मिशन कवच कुंडल योजना राबवणार आहे. दररोज किमान १५ लाख लसीकऱण झालं पाहिजे असं ध्येय आहे. लस उपलब्ध नसायची अशी परिस्थिती आता नाही. जवळजवळ ७५ लाख लशी उपलब्ध आहेत. सहा दिवसांत स्टॉक संपवण्याचं उद्दिष्ट आरोग्य विभागाला दिलं आहे.

 

आरोग्यमंत्री म्हणाले की, आजपर्यंत लसीकरणाची टक्केवारी पाहता ६२ टक्के लोकांनी पहिला डोस घेतला आहे. महाराष्ट्राला ९ कोटी १५ लाख एवढंं एकूण उद्दिष्ट आहे. यापैकी ६ कोटी पहिला डोस घेतलेल्यांची संख्या आहे. ३ कोटी २० लाख लसीकरण झालं तर राज्यातील १८ वर्षांच्या सर्व नागरिकांना पहिला डोस देऊन पूर्ण होईल. यामुळे लोकांना संरक्षण मिळेल. दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या ही अडीच कोटींच्या घरात आहेत. ३० टक्के दोन डोस पुर्ण केले आहेत. उरलेले ३ कोटी डोस दिले तर तिसऱ्या लाटेची भीती कमी होण्यास मदत होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here