Home चंद्रपूर धक्कादायक :- चंद्रपूरच्या दिक्षाभूमीवर कार्यक्रमाचे आयोजन होऊ नये म्हणून चक्क घोटेकर परिवारांची...

धक्कादायक :- चंद्रपूरच्या दिक्षाभूमीवर कार्यक्रमाचे आयोजन होऊ नये म्हणून चक्क घोटेकर परिवारांची प्रशासनाकडे धाव?

 

मात्र तरीही ऑल इंडिया पँथर सेनेच्या आंदोलनाची प्रशासनाने घेतली दखल. दिक्षाभूमी सर्वांसाठी खुली.

चंद्रपूर प्रतिनिधी:-

चंद्रपूरच्या ज्या दिक्षाभूमी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो दलित बांधवांना बौध्द धर्माची दीक्षा दिली त्या स्थळांवर अरुण व अशोक घोटेकर यांचा निर्विवाद कब्जा असून त्या स्थळावर घोटेकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय चालविल्या जात आहे, अर्थात त्यांच्या जणू मालकीची म्हणून शैक्षणिक संस्था कार्यरत आहे. या ठिकाणी दरवर्षी लाखों बौध्द बांधव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कडून बौध्द धर्माची दीक्षा देण्यात आली त्या स्थळांची भेट घेऊन व दर्शन घेऊन मानवंदना देत असतात मात्र मागील वर्षी कोरोना काळात शासनाने इथे बौध्द बांधवांना दर्शन घेण्याची परवानगी दिली नव्हती पण आता राज्य सरकारने सर्व धार्मिक उत्सव व मेळावे साजरे करण्यास मुभा दिली आहे. मात्र बौद्धांची क्रांतीभुमी ही घोटेकर बंधूंच्या जणू डोळ्यात खूपतेय की काय? म्हणूनच त्यांनी यावर्षी दिक्षाभूमीवर मानवंदना सोहळा व कार्यक्रमाचे आयोजनासाठी परवानगी देऊ नये म्हणून प्रशासनाला पत्रे देऊन लाखों बौध्द बांधवांचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र भिम अनुयायांना वंदन करण्यास कोणीही रोखू नये नाहीतर कायदा हातात घेऊन आम्ही मानवंदना करणारच अशी गर्जना करून ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संघर्षनायक, महाराष्ट्राचा ढाण्या वाघ दिपकभाई केदार यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र अध्यक्ष विनोदभाई भोळे यांच्या संघर्षातून चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार, उपाध्यक्ष त्यागीभाई, जिल्हा युवा अध्यक्ष अजय झलके, मुख्य सल्लागार संतोष डांगे, सुरेश नारनवरे, सारिका उराडे, पपीता जुनघरे, निशाल मेश्राम, सुमित कांबळे अशा शेकडो भिमसैनिकांना घेऊन जिल्हा कचेरीवर हल्ला बोल आंदोलन दिनांक १३.१०.२०२१ ला केले होते.

ऑल इंडिया पँथर सेनेच्या या आंदोलनाला यश आले असून जिल्हा पोलीस प्रशासनाने स्पष्ट सांगितले आहे की, सर्वांसाठी चंद्रपूर दिक्षाभूमी कोणत्याही नियम न ठेवता खुली केली आहे. सर्व भिम अनुयायांनी दिक्षाभुमीवर जावं आणी वंदन करावे. त्यामुळे आता घोटेकर बंधूचा तो डाव फसला असून हजारो बौध्द बांधव चंद्रपूर च्या दिक्षा भूमी स्थळावर जावून मानवंदना करत आहेत.

नागपूर मधे सुद्धा ऑल इंडिया पँथर सेनेचा पुढाकार!

नागपूर दिक्षाभूमी खुली करण्यास ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्राचे ढाण्या वाघ दिपकभाई केदार यांनी आक्रमक भुमिका घेऊन वंदन करण्यास घुसले व शासन प्रशासनाला सांगितलं कोणालाही रोखू नये त्यानंतर नागपूर दिक्षाभूमी सर्वांसाठी खुली केली. आज ऑल इंडिया पँथर सेनेच्या आंदोलनाला यश आले असून दोन्हीही दिक्षाभूमी खुल्या केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here