Home चंद्रपूर शैक्षणिक :- प्राचार्यानी दिली प्राध्यापिकेला जीवे मारण्याची धमकी, मनसे पदाधिकारी पोहचताच प्राचार्य...

शैक्षणिक :- प्राचार्यानी दिली प्राध्यापिकेला जीवे मारण्याची धमकी, मनसे पदाधिकारी पोहचताच प्राचार्य झाले पसार.

 

बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजि बामणी येथील घटना.

बल्लारपूर प्रतिनिधी :-

जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे मनसेच्या वतीने प्रहार होणार अशीच नवी रणनीती मनसेची तयार झाल्याने भल्याभल्यांना मनसेची भीती लागायला लागली आहे. बल्लारपूर तालुक्यातील बामनी स्थित बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या शैक्षणिक संस्थेच्या परिसरात नेहमीच काही ना काही घडत असत आणि त्याची चर्चा होत असते. अशीच एक घटना इथे घडली असून या संस्थेचे प्राचार्य राजनिकांत मिश्रा व त्यांचे सहकारी श्रीकांत गोजे यांनी एका प्राध्यापक महिलेवर दबाव टाकण्याचा व त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन शैक्षणिक वातावरण खराब करण्याचा प्रकार केल्याने त्या प्राध्यापक महिला कर्मचारी यांनी बल्लारपूर पोलीस स्टेशन मधे त्यांच्या विरोधात तक्रार केली होती. दरम्यान ही गोष्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी यांना माहीत झाल्यानंतर लगेच जिल्हा अध्यक्ष दिलीप रामेडवार मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार. मनकासे जिल्हाध्यक्ष रविश सिंग, मनोज तांबेकर यांच्या नेत्रूत्वात मनसे कार्यकर्त्यांनी बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजि बामणी येथे धडक देऊन प्राचार्य यांचा समाचार घेण्याचा प्रयत्न केला मात्र मनसेचे पदाधिकारी येणार असल्याची चाहूल लागताच प्राचार्य व त्याचे सहकारी यांनी तिथून पळ काढला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी इन्स्टिट्यूट मधे प्रवेश करताच तेथील सुरक्षा कर्मचारी यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला न जुमानता मनसे स्टाईल आंदोलन करून त्या प्राचार्यांना धडा शिकविण्यासाठी सर्व मनसे पदाधिकारी यांनी आतमधे प्रवेश करून पसार झालेल्या प्राचार्यांना फोन केला परंतु त्यांनी फोन उचलला नाही. येथील पीडित प्राध्यापिका यांनी पोलीस स्टेशन मधे तक्रार देऊन सुद्धा तेथील प्राचार्य राजनिकांत मिश्रा व श्रीकांत गोजे यांच्या वर कारवाई झाली नसल्याने मनसे पुन्हा आक्रमक झाली आहे. दरम्यान मनसे पदाधिकाऱ्यांकडून त्या प्राचार्याचा शोध सुरू असल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here