गांधी उद्यान योग मंडळ यांच्याकडे सोपवली नवी कोरी अम्बुलंस.
वरोरा प्रतिनिधी :-
वरोरा शहरात गांधी उद्यान योग मंडळ सदस्यांनी कोरोना काळात शहर वाशीयांच्या आरोग्य समस्यांना सोडविण्यासाठी जो उपक्रम राबवला आणि जिथे कोरोना रुग्णांना रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडर मिळत नव्हते तिथे यांनी स्वखर्चाने व इतर समाजसेवी यांच्या सहकार्याने ऑक्सिजन सिलेंडर मिळवून देऊन अनेकांचे प्राण वाचवले त्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मागील महिन्यात वरोरा येथील कार्यक्रमात सत्कार करून त्यांचे अभिनंदन व कौतुक केले शिवाय आपली ही सेवा अशीच अविरतपणे सुरू ठेवा मी माझे कडून तूम्हच्या गांधी उद्यान योग मंडळाला अम्बुलंस देईल अशी घोषणा केली होती. खरं तर भारतातील भाजपचे नेते नितीन गडकरी हे असे नेते आहेत की ते शब्दाला जागतात आणि त्यांनी अगदी कमी वेळातच गांधी उद्यान योग मंडळाच्या सदस्यांना नागपूर ला बोलावून त्यांच्याकडे नवी कोरी अम्बुलंस सुपूर्द केली. त्यामुळे या मंडळाचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे. या कार्यात प्रवीण सुराणा यांच्यासह नितेश जयस्वाल, नरेंद्र नेमाडे, सचिन जीवतोडे, जयंत मारोडकर, शैलेश शुक्ला, मनोज कोहडे, प्रमोद नांदे, वैभव डहाने, हुजैफा अली, मनीष जेठानी, दीपक गोंडे इत्यादींचा सक्रिय सहभाग होता,
कोरोना काळात जिथे लोकप्रतिनिधी जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी समोर येत नव्हते तिथे गांधी उद्यान योग मंडळ व इतर समाजसेवी व राजकीय कार्यकर्त्यांनी वरोरा शहर व तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांना योग्य ती मदत देऊन मदतीचा हात दिला. म्हणतात ना समाजसेवा हीच ईश्वरसेवा आहे आणि खऱ्या अर्थाने गांधी उद्यान योग मंडळाच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी प्रवीण सुराणा यांच्या नेत्रूत्वात जी सेवा दिली ती अविश्वसनीय व अद्वतीय अशीच आहे, नव्हे त्यांच्या हातून ईश्वरसेवाच घडली आहे आणि म्हणूनच पुन्हा त्यांच्या हातून जनतेची सेवा घडावी अर्थात रुग्णांचे प्राण वाचावे यांसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जी अम्बुलंस भेट दिली त्यामुळे प्रवीण सुराणा व त्यांच्या टीम चे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. त्यांच्या या उत्तुंग कार्याबद्दल प्रवीण सुराणा व त्यांच्या टीम चे भूमिपूत्राची हाक न्यूज नेटवर्क समूहातर्फे खूप खूप अभिनंदन.