राजकीय भामटय़ांनी रात्रीच्या अंधारात साधला डाव. राजकीय वैमनस्यातून केलेल्या या भ्याड कृत्यांचा शहरात सर्वत्र होत आहे निषेध.
वरोरा प्रतिनिधी :-
स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॉरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बैँके चे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक रवींद्र शिंदे यांनी वरोरा भद्रावती या विधानसभा क्षेत्रात जनतेला आरोग्य सुविधा आणि आर्थिक सहकार्य देऊन संकटकाळी जणू मदतीचा हात दिला असल्याने त्यांच्याविषयी जनतेत सहानुभूती आणि आदर निर्माण झाला आहे. दरम्यान दिनांक १३ ओक्टोंबर ला त्यांचा वाढदिवस होता व त्यामुळे वरोरा शहरात त्यांच्या वाढदिवसाचे सहकाऱ्यांनी चौकाचौकात मोठमोठे बैनर लावले व त्यांचा १३ ओक्टोंबरला वरोरा येथे वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात. त्यात राष्ट्रवादीचे नेते मोरेश्वर टेमुर्डे, राष्ट्रवादीचे नेते डॉ. अशोक जिवतोडे. ओबीसी नेते अँड पुरुषोत्तम सातपुते, मनसे नेते रमेश राजूरकर, सीडीसीसी बैँकेचे संचालक विजय देवतळे, दत्ता बोरीकर व इतर नेते मंडळी उपस्थित होती. रवींद्र शिंदे यांच्या वाढदिवशी त्यांनी अनेकांना आर्थिक मदत व अनेकांचा सत्कार करण्यात आला अर्थात त्या दिवशी वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात सगळीकडे रवींद्र शिंदे यांच्या सामाजिक कार्याचा झंझावात दिसत होता, त्यामुळे काही राजकीय वैर असणारे भामटे आणि समाजकंटक यांनी वरोरा शहरात रवींद्र शिंदे यांच्या वाढदिवसाचे चौकाचौकात लावलेले बैनरच गायब केल्याने या भ्याड कृत्यांचा शहरात सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे.अशा प्रकारचे राजकीय वैमनस्य वरोरा शहरात पहिल्यांदाच बघावयाला मिळाले असल्याने याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
रवींद्र शिंदे यांच्या समाजकार्याने जर गोरगरिबांना मदत होत असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे. जनतेच्या दुःखात संकटात धावून जाणाऱ्या लोकप्रतिनिधीची खरे तर या राजकीय क्षेत्रात फार गरज आहे आणि राजकारण बाजूला ठेऊन जर रवींद्र शिंदे सर्व राजकीय पक्ष सामाजिक संघटना यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सामाजिक कार्य करत असेल तर त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे कारण ते कुठल्याही राजकीय बैनरवर राजकीय स्टंटगिरी करताहेत असं वाटत नाही, पण त्यांच्या वाढदिवसाचे बैनर गायब करणे व फाडने हे विरोधकांच्या कुठल्या राजकीय संस्कृती मधे बसते, हेच कळत नसून ज्या कुणी व्यक्तींनी ही भ्याड कामगिरी आणि भामटेपना केला असेल त्याची चौकशी होऊन कारवाई करावी अशी मागणी रवींद्र शिंदे यांच्या समर्थकांनी प्रशासनाकडे केली आहे अशी माहिती आहे. या संदर्भात राजकीय पुढाऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया असून रवींद्र शिंदे आता या प्रकरणी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.