राज्याचे महामहिम कुलपती श्री.भगतसिंग कोस्यारी यांची उपस्थिती.
चंद्रपूर प्रतिनिधी :-
गोंडवाना विद्यापिठाच्या ९ व्या दीक्षांत समारंभात महाराष्ट्राचे राज्यपाल आदरणीय महामहिम कुलपती श्री. भगतसिंग कोस्यारी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या पदवीदान समारंभात गुणवंत विद्यार्थिनी मृणाली नानाजी वसाके यांचा सत्कार करण्यात आला.
सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर येथील एम. ए. भूगोल विषयाची विद्यार्थिनी मृणाली नानाजी वसाके (सौ. मृणाली सचिन निंबाळकर) हिने 950 गुण (9.50 SGP) घेऊन विद्यापीठातील गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकावून यश संपादित केले.
मृणाली नानाजी वसाके (सौ मृणाली सचिन निंबाळकर)यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.सौ मृणाली हिने आपल्या यशाचं श्रेय सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोडजी काटकर सर, भूगोल विभाग प्रमुख डॉ. वनश्री लाखे, आई वडील, सासू सासरे यांना दिलेले आहे.