वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील जनतेला आरोग्य सुविधा आणि संकटात सापडलेल्या गरजूंना दिला मदतीचा हात.
व्यक्तिविशेष :-
जनतेच्या दुःखात संकटात धावून जातो तोच खरा समाजसेवक असं म्हटल्या जातं ते सार्थक करून दाखवलं चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रविभाऊ शिंदे यांनीच. मला समाजासाठी काहीतरी करायचंय हा मुलमंत्र मनाशी बाळगून दुःखात संकटात सापडलेल्या माणसांना आपली सामाजिक बांधिलकी जपून हवी ती मदत पुरविणारे रवींद्र शिंदे यांनी खरे तर कोरोना च्या संकटात जिथे लोकप्रतिनिधी घरीच होते तिथे त्यांनी समाजसेवेचे व्रत घेऊन कोरोना रुग्णांची मनोभावे सेवा केली आणि स्वतःचे मंगल कार्यालय कोविड सेंटर साठी प्रशासनाला देऊन माणुसकी दाखवली ती अनेकांना साधता आली नाही हे विशेष!
रविभाऊ शिंदे यांनी काही कालावधीत त्यांचे वडील स्व. श्रीनिवासराव शिंदे यांच्या स्मरणार्थ स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॉरिटेबल ट्रस्टची स्थापना करून त्या माध्यमातून समाजसेवेचा झंजावात कोरोना काळात सुरू केला तो आजही सुरूच ठेवला आहे. या ट्रस्ट च्या माध्यमातून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत असो, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च असो, ज्या शेतकऱ्यांचे बैल जनावरे मरण पावली त्यांना तात्काळ मदत असो की वीज पडून किंव्हा अपघातात मरण पावलेल्या गरीब कुटुंबातील मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत असो रवींद्र शिंदे हे त्या संकटात सापडलेल्या कुटुंबीयांना मदतीचा हात देऊन एक देवदूत ठरत आहे.
रवींद्र शिंदे यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेंच्या विविध योजनांचा लाभ समाजातील प्रत्येक घटकाला झाला पाहीजे . यासाठी त्यांनी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांच्या मार्गदर्शनात शेतकऱ्यांना मदत पोहचविण्याचे महत्वपूर्ण कार्य सुरू केले आहे. त्यातच त्यांनी बैंकेचे सर्व संचालक यांना सोबत घेऊन भद्रावती-वरोरा या दोन्ही तालुक्यातील प्रत्येक गावागावात बैंकेच्या योजनेच्या माध्यमातून गरजवंताना मदत करण्यासाठी स्वतःचा जनसंपर्क वाढविला आहे. त्यातून ग्रामीण जनतेला फार मोठे आर्थीक बळ मिळत आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या योजनाचा लाभ हा दोन्ही तालुक्यातील महिला बचत गटांना होऊन महिलांची आर्थिक स्थिती मजबूत होत आहे. शेतकरी बांधवावर येणारे नैसर्गिक संकट, आकस्मिक बैलांचा मृत्यु , वन्यप्राण्याचा हल्ला या सारख्या दुर्दैवी घटना घडल्यास बँकेद्वारे त्यांना तात्काळ मदत दिल्या जात आहे. अर्थात त्यामधे रवींद्र शिंदे यांचा पुढाकार महत्वपूर्ण आहे.
चंदनखेडा येथील शेतकरी माणिक सदाशीव बागेसर या शेतकऱ्याने कर्जबाजारीमुळे ऐन पोळ्याच्या दिवशी गावातील विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. तेंव्हा त्यांच्या मदतीला कुणी धावून आले नाही अशा आशयाची बातमी भूमिपूत्राची हाक या न्यूज पोर्टल वर धडकताच स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॉरिटेबल ट्रस्टच्या वतीने रवींद्र शिंदे यांनी बागेसर कुटूंबाला आर्थीक मदत दिली. सोबतच बागेसर कुटूंबातील प्रशिक,अरोहन व आकांक्षा या मुलांच्या शिक्षणाचा खर्च सुध्दा ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात येत आहे. कॅन्सरग्रस्त व विविध आजाराने पिडीत असलेल्या रुग्णांना सुध्दा ट्रस्टद्वारे त्यांचे मदत कार्य सुरूच आहे.
अशा या समाजसेवेचं व्रत घेतलेल्या धेयवेड्या युवा नेत्यांचा वाढदिवस आज दिनांक १३ ऑक्टोबरला आहे. खरं तर त्यांच्या कार्याला समाजातील सर्व घटकांनी सलाम करावा असेच अद्वतीय परमेश्वरी कार्य त्यांच्या हातून घडत आहे, त्यामुळे परमेश्वर त्यांच्या या कार्याला अधिक व्यापकता देवो व त्यांच्या हातून गोरगरीब,शोषित, पीडितांना आधार मिळो, शिवाय समाजात त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकणारी नवी पिढी उदयास येवो हीच त्यांच्या वाढदिवसानिमित परमेश्वराचरणी प्रार्थना व त्यांच्या दीर्घायुष्यासाठी व यशस्वी वाटचालीसाठी कोटी कोटी शुभेच्छा!