Home चंद्रपूर क्राईम ब्लास्ट :- प्रेमाच्या नशेत धुंद महिलेच्या प्रियकराने केला पतीचा खून. अवघ्या...

क्राईम ब्लास्ट :- प्रेमाच्या नशेत धुंद महिलेच्या प्रियकराने केला पतीचा खून. अवघ्या काही तासातच प्रेमी गजाआड.

 

प्रेमाच्या गावात आणि मग बाराच्या भावात. चंद्रपूरातील खळबळजनक घटना.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

पडोली पोलीस स्टेशन हद्दीत एका इसमाचे प्रेत लावारीश स्थितीत पडून असल्याची खळबळजनक घटना काल दि.१६ ऑक्टोंबर २०२१ रोजी सकाळच्या सुमारास समोर आली.याची माहिती पोलीस स्टेशनला मिळताच पोलिसांनी सिनर्जी वर्ल्ड परीसरातील मागील बाजूस एका अनोळखी पुरुषाचे प्रेत रक्ताच्या थारोळयात पडून असल्याचे आढळून आल्याने त्यांनी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांचेसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक बाळासाहेब खाडे यांना माहिती दिली.मृतक हा अनोळखी असल्याने त्याची ओळख पटने कठीण होते कारण घटनास्थळावर कुठलाही पुरावा किंवा कोणतेही हत्यार दिसून येत नव्हते.

सदर खुनाचा छडा लावणे हे फार कठीण होते.त्यामुळे या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्याकडे देण्यात आला. त्यांनी हे प्रकरण हाती घेताच तपासाची चक्र वेगाने फिरवून घटनास्थळी भेट दिली आणि सदर मृतकाची ओळख पटविण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी तपास सुरू केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चंद्रपूर शहरातील दुर्गापूर, बंगाली कॅम्प, रय्यतवारी, अष्टभुजा, प्रकाश नगर अशा विविध भागात फिरुन मृतकाचा घटनास्थळावरील फोटो लोकांना दाखवून अनोळखी मृतक ईसम कोण? याबाबत माहिती घेतली असता पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे यांचे पथकास यातील मृतक हा राजू अनंत मल्लीक (४५) वर्षे व्यवसाय रोज मजूरी रा.प्रकाश नगर अष्टभुजा वार्ड, चंद्रपूर असल्याचे निष्पन्न झाले. तसेच गोपनिय सुत्रदाराकडुन माहीती घेतली असता तो मृतक राजू अनंत मल्लीकच असल्याची पृष्टी मिळाली.

या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, अंमलदार यांनी मयत व त्याची पत्नी यांचेसह संशयीत इसम नामे जितेंद्रसिंग भंडारी यांचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याची माहिती प्राप्त करून घेतल्यानंतर या प्रकरणी संशयीत ईसम हा मृतक व त्याचे पत्नीच्या सतत संपर्कात असल्याबाबतची विशेष सूत्रांकडून पुष्टी केली आणि संशयीत जितेंद्रसिंग भंडारी याला दुर्गापूर परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्यास ताब्यात घेवून स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे व पो. उपनि संदीप कापडे यांनी त्याची कसून चौकशी सुरू केली असता प्रथम तो मी नव्हेच या अविर्भवात उडवा उडविचीच उत्तरे देत होता. त्यानंतर त्याची उलट सुलट चौकशी केली असता त्यात संशयीत व्यक्तीने खून केला असल्याचा दाट संशय बळावला. त्यानंतर त्याला विश्वासात घेवून पोलीस भाषेत विचारपूस केली असता तो पोपटासारखा बोलायला लागला व मृतकाला कां मारले? याबाबत विचारणा केली असता माझे मृतकाच्या पत्नी सोबत मागील ५ वर्षापासून प्रेमसंबंध होते. ती मागील १ वर्षापासून छत्तीसगड राज्यातील तिचे माहेरी ‘कान्केर’ या गावी मुलासह गेली होती. त्या दोघांच्या प्रेमसंबंधात मृतक ईसम हा अडसर ठरत असल्याने त्याचा कायमचाच काटा काढण्याचा प्लान आखला. त्यानुसार दि.१५ ऑक्टोंबर २०२१ रोजी रात्री ७ वाजताच्या दरम्यान आरोपीने मृतकास सिनर्जी वर्ल्ड मागील निर्जन परीसरात नेवून त्याला दारू पाजली व त्यास लोखंडी रॉडने डोक्यावर मारून जिवानीशी ठार मारल्याची कबुली दिली.

प्रेमाच्या गावात आणि मग बाराच्या भावात या वाक्याला सार्थक ठरणाऱ्या सदर गुंतागुंतीच्या हत्याकांडाचा यशस्वी छडा लावण्याची कामगिरी अरविंद साळवे पोलीस अधिक्षक चंद्रपुर, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक बाळासाहेब खाडे व पोलीस उप निरिक्षक संदिप कापडे स्थानिक गुन्हे शाखा यांचेसह पथकाचे सहकारी पोलीस सचिन गदार्द, अतुल कावळे यांचे सह पो.हवा. संजय आतकुलवार, स्वामी चालेकर, पंडीत वन्हाडे, ना.पो.कॉ. गजानन नागरे, पो.शि. प्रशांत अमोल धंदरे, संदीप मुळे, रविंद्र पंधरे, नितीन रायपूरे कुंदसिंग बावरी, प्रांजल झिलपे, गोपाल आतकुलवार, गणेश मोहूले, दिपक डोंगरे, प्रशांत धुडगंडे, दिनेश अराडे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here