Home वरोरा अखेर सामाजिक कार्यक्रमाचे व वाढदिवस शुभेच्छांचे फलक फाडल्याबाबत एसडिओ यांच्या कडे तक्रार.

अखेर सामाजिक कार्यक्रमाचे व वाढदिवस शुभेच्छांचे फलक फाडल्याबाबत एसडिओ यांच्या कडे तक्रार.

 

फलक फाडणारे ते गुंड गजाआड होतील का? शहरात सुरू झाली चर्चा.

वरोरा प्रतिनिधी :-
रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत काही समाजकंटक व समाजविघातक प्रवृत्तींनी डाव साधला आणि चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बैँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रवींद्र शिंदे यांच्या सामाजिक उपक्रमाचे दर्शनी फलक फाडून राजकीय वैमनस्य जोपासले त्या भ्याड कृत्यांचा शहरात सर्वत्र निषेध होत आहे.
दि. १३ ऑक्टोबर २०२१ रोज बुधवारला स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट तर्फे सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन शेतकरी, शेतमजुर, कोरोनाबाधित, कर्करुग्ण, अनाथ व गरजु विद्यार्थी, यांना आर्थीक सहकार्य तथा कोरोनाने मृत झालेल्या व गरीब गरजु शेतकरी शेतमजुरांच्या पाल्यांच्या निशुल्क विवाह मेळाव्याच्या नोंदणी अर्जाचा शुभारंभ विधानसभेचे माजी उपाध्यक्ष ॲड. मोरेश्वरराव टेमुर्डे यांच्या हस्ते करण्यात आला, कोरोना योध्दाचा सत्कार, वृक्षारोपन, अभ्यासिकेला पुस्तक भेट, आदी विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविन्यात आले होते. या उपक्रमाची माहिती म्हणुन व वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वरुपात वरोरा शहरातील दर्शनी भागात, जिथे नेहमी होर्डींग्ज लावल्या जातात, त्या ठीकाणी दर्शनी फलक, बैनर लावण्यात आले होते. मात्र (दि.१३) च्या रात्रीच अज्ञाताद्वारे शहरातील विविध ठीकाणची बैनर, फलक फाडल्या गेली. माढेळी येथील दर्शनी फलक रेती भरलेल्या ट्रॅक्टरवर उभे राहून फाडले आहेत. हे एक समाजविघातक, आकसपुर्ण, चुकीचे व सामाजिक स्वास्थ्य तथा शांतता भंग करण्याचे समाजविरोधी कृत्य असल्याने अशा समाजविघातक प्रवृत्तीला वेळीच आळा घातल्या जावा या करीता रवि शिंदे मित्र परिवार यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे तक्रार देऊन त्या समाजकंटकांनी केलेल्या गुन्ह्यात अटक करावी अशी मागणी केली आहे.
वरोरा-भद्रावती हे सामाजिक व धार्मिक शहरे आहेत. कर्मयोगी स्व. बाबा आमटे यांचा सामाजिक वारसा या भुमीला लाभला आहे. माजी मंत्री स्व. संजय देवतळे यांनी या क्षेत्रात शांतता ठेवली होती. मात्र मागील काही वर्षांपासून या शहरांचे सामाजिक आरोग्य बिघडले असुन अवैध व्यवसाय व समाजविघातक घटना वाढीस लागल्या आहेत.
शहरातील अनेक मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरा लागले आहेत. त्यामुळे सीसीटीव्ही फूटेज तपासून बघीतल्यास फलक फाडणारे कोण ते दिसू शकतात. व ‘त्या’ समाजकंटकाविरोधात योग्य ती कठोर कार्यवाही करावी असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारीची प्रत्यक्ष भेट घेवुन सदर समाजविघातक कृत्याचा ताबडतोब तपास घेवुन योग्य कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावर उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी ताबडतोब सुत्र हलवून तपास सुरु केला आहे.
——————‐—————————
आम्ही सामाजिक क्षेत्रात कार्य करीत आहोत. समाजात राहत असतांना आपण समाजाच देण लागतो. ही आमची भावना आहे. यासाठीच ट्रस्टच्या माध्यमातून सातत्यपुर्ण लोकसेवेचे व्रत हाताळत आहो. मात्र आमच्या या सामाजिक कार्याच्या प्रवासात असे सामाजिक उपद्रव आमची इच्छाशक्ती कमी करु शकनार नाही. आम्ही आपले काम करीत राहू, कुणीही या क्षेत्रातील सामाजिक शांतता भंग करु नये, माझी इच्छा नसतांना मित्र परीवारांनी सदर प्रकरणाबाबत निवेदन दिले, आमचा मार्ग शांततेचा आहे,

रवि शिंदे, स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरीअल चॅरीटेबल रविंद्र शिंदे ट्रस्ट,
Previous articleक्राईम ब्लास्ट :- प्रेमाच्या नशेत धुंद महिलेच्या प्रियकराने केला पतीचा खून. अवघ्या काही तासातच प्रेमी गजाआड.
Next articleधक्कादायक :- एका पाच वर्षीय चीमुकलीवर 27 वर्षीय नराधमाचा बलात्कार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here