Home वरोरा धक्कादायक :- एका पाच वर्षीय चीमुकलीवर 27 वर्षीय नराधमाचा बलात्कार.

धक्कादायक :- एका पाच वर्षीय चीमुकलीवर 27 वर्षीय नराधमाचा बलात्कार.

 

नवरात्री महोत्सव निमित्याने शारदा देवी जवळ महाप्रसादचा कार्यक्रम असल्याने आरोपीने साधला डाव.

किशोर डुकरे प्रतिनिधी :-

नवरात्री उत्सवात संपूर्ण गावकरी एकत्र आल्याची संधी साधून एका 27 वर्षीय नराधमांने पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत घडली असून ठाणेदार अविनाश मेश्राम यांनी आरोपी शंकर गणेश गजभे वय 27 वर्ष याला अटक करून त्याचेवर कलम 376 ab 376 (२) ( j ) भांदवी सहकलम ६ पासको अंतर्गत गुन्हे नोंद करून अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक शेगाव येथून जवळच असलेल्या अर्जुनी येथे काल रात्रौला येथील एका पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली असल्याने एकच खळबळ उडाली असून नवरात्री महोत्सव निमित्याने शारदा देवी जवळ महाप्रसाद चा कार्यक्रम आयोजित केला होता व हा कार्यक्रम रात्री 9 वाजेपर्यंत सुरू होता दरम्यान जेवण करून घरी जात असता पाच वर्षीय चिमूकलिला एकटी पाहून मोहल्यात राहणारा नराधम आरोपी शंकर गणेश गजभे याने मुलीचा हात धरून रस्तालगत असलेल्या गुराच्या गोठ्यात नेले व तिच्यावर अत्याचार करीत असल्याचे कृत्य एका महिलेने पाहिले असता या महिलेने हा प्रकार तिच्या आई ला सांगितला असता आईने मुलीसह पोलीस स्टेशन गाठले व सर्व प्रकार येथील पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री अविनाश मेश्राम यांना सांगितला असता आरोपी शंकर गणेश गजभे वय 27 वर्ष याला पोलिसांनी अटक करून कलम 376 ab 376 (२) ( j ) भांदवी सहकलम ६ पासको नुसार ताब्यात घेऊन अटक करण्यात आली…

सदर प्रकरणाचा अधिक तपास येथील ठाणेदार श्री अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनात उपपोलीस निरीक्षक श्री प्रवीण जाधव करीत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here