Home वरोरा खळबळजनक :- बेकायदेशीर चालणाऱ्या बोरी रेती घाटावर रात्री उपविभागीय पोलीस अधिकारी नेपानी...

खळबळजनक :- बेकायदेशीर चालणाऱ्या बोरी रेती घाटावर रात्री उपविभागीय पोलीस अधिकारी नेपानी यांची धाड.

 

हायवा ट्रक व बोट जप्त झाल्याची माहिती आली समोर. उपविभागीय पोलीस अधिकारी नेपानी यांचे सर्वत्र कौतुक.

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा तालुक्यात अवैध धंद्याला उधाण आले असताना आता नव्याने रुजू झालेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी नेपानी यांनी त्या अवैध धंद्यावर अंकुश लावण्यास सुरुवात केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे काल रात्रीला 10.00 च्या सुमारास त्यांनी स्वता बोरी रेती घाटावर धाड टाकून रेतीचा अवैध उपसा होत असताना बोटी, हायवा व ट्रक जप्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे. राजकीय वरदहस्त असल्याने काही रेती माफिया अवैधपणे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन वर्धा नदीतून मोठ्या प्रमाणात बोटीच्या साह्याने रेती उपसा करून ती रेती खुल्या बाजारात विकत होते.

उपविभागीय पोलीस अधिकारी नेपानी यांच्या या धाडसी कारवाई ने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे, कारण आतापर्यंत जे अधिकारी होते त्यानी केवळ सर्वसामान्य लोकांच्या रेतीच्या गाड्या पकडल्या पण राजकीय हस्तीच्या गाड्याना हात पण लावला नाही त्यामुळे रेती साठा लिलावात घेऊन त्यांच्या टीपी च्या साह्याने खुलेआम अवैध रेतीचा धंदा जो जोरात सुरू होता त्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी नेपानी यांनी अंकुश लावल्याने वरोरा शहरात त्यांच्या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. घटनास्थळावरून बोटीजेसीबी मशीन जप्त करून तिथे पोलीस बंदोबस्त लावल्याचे व गाड्यांच्या ड्रायव्हरला अटक केल्याची माहिती आहे. आतापर्यंत सुरू असलेल्या अवैध रेतीच्या धंद्याला महसूल अधिकारी असणाऱ्या उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी का अंकुश लावला नाही? असा प्रश्न जनता विचारत असताना आता उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी स्वता रेती माफियांच्या मुसक्या आवळन्यास सुरुवात केली असल्याने रेती माफियांचे धाबे दणाणले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here