Home Breaking News आरोग्य वार्ता :- प्राथमिक आरोग्य केंद्र कोसरसार येथे कोविड लसीकरण वाहन व...

आरोग्य वार्ता :- प्राथमिक आरोग्य केंद्र कोसरसार येथे कोविड लसीकरण वाहन व रुग्णवाहिकेचे उद्घाटन.

 

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या आदेशाने जिल्हा स्थानिक निधीतून दिलेल्या या रुग्णवाहिके चे जि.प.सदस्य आसावरी देवतळे यांनी केले उद्घाटन.

खाबाडा,मनोहर खिरटकर:-

वरोरा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कोसरसार येथे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या आदेशाने स्थानिक जिल्हा निधीतून देण्यात आलेल्या रुग्णवाहिचे व लसीकरण याचे जिल्हा परिषद सदस्य आसावरी देवतळे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

कोरोना काळात रूग्नाची तथा गर्भवती महिलांची झालेली गैरसोय लक्षात घेता जिल्हा स्थानिक निधीतून या रुग्णवाहिका पालकमंत्री विजय वड्डेटिवार यांच्या माध्यमातून देण्यात आल्या या रुग्णवाहिकेचे उदघाटन जिल्हा परिषद सदस्य डॉ. आसावरी देवतळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी पंचायत समिती सदस्य पपिता गुळघाने पंचायत समिती सदस्य वंदना दाते, डॉ. सोनाली कपूर सरपंच गणेश मडावी उपसरपंच अमित बहादूरे प्रहार सेवक गणेश उराडे माजी उपसरपंच पुरुषोत्तम कुडे वैद्यकीय अधिकारी डॉ.आशिष देवतळे, डॉ. मृणाली अवचट तसेच कर्मचारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Previous articleखळबळजनक :- बेकायदेशीर चालणाऱ्या बोरी रेती घाटावर रात्री उपविभागीय पोलीस अधिकारी नेपानी यांची धाड.
Next articleवरोरा तालुक्यात सोयाबीनच्या काढणी मधे पावसाचा अडंगा? लाखो रुपयाचे शेतकऱ्यांचे नुकसान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here