Home वरोरा वरोरा तालुक्यात सोयाबीनच्या काढणी मधे पावसाचा अडंगा? लाखो रुपयाचे शेतकऱ्यांचे नुकसान

वरोरा तालुक्यात सोयाबीनच्या काढणी मधे पावसाचा अडंगा? लाखो रुपयाचे शेतकऱ्यांचे नुकसान

 

सोयाबीनचे सरकारी दर गडगडले आणि हाती आलेले सोयाबीनचे पीक पावसामुळे काळे पडले शेतकरी चिंतेत.

खांबाडा मनोहर खिरडकर ;-

खाबाडा परिसरात सोयाबीनची काढणी, मळणी हंगाम जोमाने सुरू झाला असताना आकस्मिक पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडवली आहे. वरोरा तालुक्यातील परिसरात पावसाने उघाड दिल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणी व मळणीच्या कामाला सुरुवात केली मात्र आकस्मिक पावसाने सोयाबीनच्या पिकावर व सोयाबीन कापणीवर जणू संक्रांत आली असून सोयाबीनच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

अगोदरच मुसळधार पावसाने सोयाबीनवर करपाव तांबेरा सदृश्य रोगांचे संकट आले होते त्यामुळे सोयाबीनला चांगला उतारा मिळाला नाही. नदीकाठी सोयाबीनचे महापुरामुळे व अतिवृष्टीमुळे खूप नुकसान झाले आहे. आता मळणी सुरू झाली आहे. एकीकडे 13 हजार रुपए क्विंटल चा भाव घसरून चार हजाराच्या आसपास आला आहे तर सोयाबीनची एकरी काढणी दर तीन हजार झाला आहे. मळणी साठी पोत्याला दोनशे रूपये दर आहे. सोयाबीनला खरेदीदार व्यापारी प्रति क्विंटलला ओलावा व पाऊसामुळे सोयाबीन काळे पडले त्यामुले तीन ते चार हजार रुपये दर देत आहेत. त्यामुळे ऐन सनासुदीच्या काळात शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे भाव गडगडल्याने व सोयाबीन काढणीसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत असल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. आतामॉईश्वरला किती दर याची शेतकऱ्यांना माहिती नाही. त्यामुळे व्यापारी म्हणेल तो दर आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. खरेदीदार दुकानदारांनी सोयाबीन मॉईश्वरनुसार दर लावावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीने या गोष्टींकडे लक्ष देण्याची मागणी होऊ लागली आहे.

जुलैमध्ये पोथरा नदिस आलेल्या महापुरामुळे हजारो हेक्टर क्षेत्रातील सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. आता या सोयाबीन पिकांची काढणी व ,मलणी सुरू झाली आणि निसर्गाने आपले उग्ररुप धारण केले आणि पाऊस पुन्हा सुरू झाला त्यामुले शेतकरी पुरता हतबल झाला आहे.

Previous articleआरोग्य वार्ता :- प्राथमिक आरोग्य केंद्र कोसरसार येथे कोविड लसीकरण वाहन व रुग्णवाहिकेचे उद्घाटन.
Next articleअत्यंत थरारक :- बायकोच्या प्रियकराचे धारदार चाकूने शीर केलं धडावेगळं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here