Home क्राईम स्टोरी अत्यंत थरारक :- बायकोच्या प्रियकराचे धारदार चाकूने शीर केलं धडावेगळं.

अत्यंत थरारक :- बायकोच्या प्रियकराचे धारदार चाकूने शीर केलं धडावेगळं.

मृतदेहाचं शीर गायब असल्याने संबंधित मृतदेह कोणाचा याबाबत बनलं होतंय गूढ.

मुंबई न्यूज नेटवर्क :-

प्रेमाच्या प्रकरणात कधी काय होईल याचा नेम नसतो अस कित्तेक वेळा समोर आल्यानंतर सुद्धा प्रेमाच्या गावात लोकांची गर्दी काही केल्या कमी होताना दिसत नाही. असाच एका मामला मुंबई येथे घडला असून मुंबई पोलीस दलात शिपाई म्हणून कार्यरत असणाऱ्या एका तरुणाने अकलूज येथील त्यांच्या पत्नीचा प्रियकर असणाऱ्या एका भाजी विक्रेत्या तरुणाची निर्घृणपणे हत्या केल्याची चित्तथरारक घटना घडली आहे.

आपल्या पत्नीसोबत प्रेमसंबंध ठेवल्याच्या रागातून आरोपी पोलिसानं क्रूरतेचा कळस गाठला आहे. आरोपीनं पत्नीच्या प्रियकाराला मुंबईला बोलावून घेत, त्याला शुद्ध हरपेपर्यंत दारू पाजली. त्यानंतर आरोपी पोलिसाने धारदार चाकूने संबंधित भाजी विक्रेत्या तरुणावर वार कर त्याचं शीर धडावेगळं केलं होतं. त्यानंतर आरोपीनं मुंबईतील अँटॉप हिल परिसरात हा मृतदेह टाकून दिला होता. मृतदेहाचं शीर गायब असल्याने संबंधित मृतदेह कोणाचा याबाबत गूढ बनलं होतं. पण मृत व्यक्तीच्या गुडघ्यात बसवलेल्या प्लेटद्वारे तपास करत पोलिसांनी खूनाचा उलगडा केला आहे.

या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पोलिसासह त्याच्या पत्नीला अटक केली आहे. दोन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे. मोनाली गायकवाड आणि शिवशंकर गायकवाड अशी अटक झालेल्या आरोपी पती-पत्नीचं नाव आहे. तर दादा जगदाळे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून तो सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील रहिवासी आहे. दादा जगदाळे आणि मोनाली गायकवाड यांच्यात गेल्या काही दिवसांपासून प्रेमसंबंध सुरू होते. दादा हा मोनाली यांच्या माहेरचा रहिवासी आहे. पण मोनालीचं मुंबईतील शिवशंकर गायकवाड याच्याशी लग्न झालं होतं. लग्नानंतरही मोनाली दादाच्या संपर्कात होती.

पोलिसाची बायको मोनाली सतत कोणाशी तरी मोबाइलवरून बोलते, याचा संशय शिवशंकरला आला होता. यातून मोनाली आणि शिवशंकर यांच्यात सतत वाद देखील होतं होता. दरम्यान आरोपी शिवशंकरने दादा जगदाळे यांना फोन करून मुंबईला बोलावून घेतलं होतं. 29 सप्टेंबर रोजी आरोपीनं दादाला शुद्ध हरपण्यापर्यंत दारू पाजली होती. त्यानंतर शुद्ध हरवलेल्या दादाची शिवशंकरने निर्घृण हत्या केली होती. आरोपीनं धारदार शस्त्राने दादा यांचं शीर धडावेगळं केलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here