Home वरोरा धक्कादायक :- तंटामुक्ती अध्यक्षांनीच केली प्रकाश ठाकरे यांच्या शेतातील उभ्या पिकाच्या सोयाबीनची...

धक्कादायक :- तंटामुक्ती अध्यक्षांनीच केली प्रकाश ठाकरे यांच्या शेतातील उभ्या पिकाच्या सोयाबीनची चोरी.

 

खरवड येथील तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण गिरडकर यांच्यासह किशोर गाठे,प्रफूल गिरडकर, रविंद्र डवरे,सुधीर घामट, ढोले,कोलाम यांच्या विरोधात वरोरा पोलीस स्टेशन मधे तक्रार.

वरोरा प्रतिनिधी :-

गावातील तंटे मिटवून गावात शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी म्हणून महात्मा गांधी तंटामुक्ती समित्या प्रत्त्येक गावात तयार करण्यात आल्या मात्र काही तंटामुक्ती अध्यक्षच गावात तंटे निर्माण करताहेत असे निदर्शनास येत असून वरोरा तालुक्यातील खरवड या गावात तंटामुक्ती अध्यक्ष असलेल्या लक्ष्मण गिरडकर यांनी स्वता आपल्या साथीदारांसह प्रकाश ठाकरे यांच्या सोयाबीन च्या शेतात पिकाची कापणी करून ते पिकच चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सामाईक मालकी व ताब्यातील मौजा खरवड, तह, वरोरा, जि. चंद्रपूर येथील शेत भुमाक. १७१/८, आराजी हे ५-८० हे आर हया वर्णनाची शेत जमीन ही प्रकाश ठाकरे व त्यांच्या भावाच्या नावाने रेकॉर्ड वर असताना व सदर शेत जमीनी संबंधाने कोर्ट विद्यमान जिल्हा न्यायाधिश – १, वरोरा ह्यांच्या न्यायालयात या प्रकरणी दिनांक ०८/१०/२०२१ रोजी प्रकाश ठाकरे यांच्या बाजूनेच निकाल लागलेला असताना आरोपी लक्ष्मण गिरडकर, किशोर गाठे,
प्रफूल गिरडकर, रविंद्र डवरे,सुधीर घामट, ढोले,कोलाम यांनी ठाकरे यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची कापणी करून त्या पिकाची चोरी केल्याने प्रकाश ठाकरे यांनी वरोरा पोलीस स्टेशन येथे तक्रार केली व आरोपी विरोधात गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

प्रकाश ठाकरे यांच्या खरवड येथील शेतात त्यांनी सोयाबीन पेरले होते व त्या शेतीवर त्यांचाच ताबा आहे, मात्र सदर शेत जमीन ही प्रकाश ठाकरे व व त्यांचे भाऊ हयांच्या ताब्यात व वहिवाटीत असताना व सदर शेतात चालू कास्तकारी हंगामात सोयाबीन हया पिकाची लागवड केली होती हे तलाठी रेकॉर्ड वर असताना खरवड येथील किशोर गाठे, लक्ष्मण गिरडकर, प्रफूल गिरडकर, रविंद्र डवरे, सुधीर घामट, ढोले,कोलाम इत्यादींनी शेतमालक बाहेरगावी गेल्याची संधी साधून सोयाबीनच्या पिकाची कापणी केली व ते पीक चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार दिनांक १३/१०/२०२१ रोजी उघडकीस आला असून ४ ते ५ ट्रॅक्टरने व तसेच इतर मजुरांच्या मद्दतीने सोयाबीन चे पीक कापून चोरुन नेले असल्याची तक्रार पोलीस स्टेशन मधे प्रकाश ठाकरे यांनी दिली मात्र यावर अजूनपर्यंत कारवाई झाली नसल्याची बाब समोर आली असून या संदर्भात शेतकरी प्रकाश ठाकरे हे काय भूमिका घेतात हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

Previous articleअत्यंत थरारक :- बायकोच्या प्रियकराचे धारदार चाकूने शीर केलं धडावेगळं.
Next articleआवाहन:- ओबीसी आरक्षणाच्या विरोधात काम करणा-यांना बाजूला करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here