Home चंद्रपूर लक्षवेधक:- सुगंधित तंबाखूच्या धंद्यात अन्न औषधी प्रशासन विभागासोबत साठगांठ करणारा तो मोरक्या...

लक्षवेधक:- सुगंधित तंबाखूच्या धंद्यात अन्न औषधी प्रशासन विभागासोबत साठगांठ करणारा तो मोरक्या कोण?

 

वसिमचा गेम करून जयसूख, मनसूख हरीश, जितू व गुप्ताचा सुगंधित तंबाखूचा धंदा जोरात. काय आहे छडयंत्र?

लक्षवेधक :-

जिल्ह्यात दारूबंदी उठविल्यानंतर महाराष्ट्र राज्यात बंदी असलेल्या सुगंधित तंबाखू चा व्यापार जिल्ह्यामध्ये जोरात सुरू आहे. एकेकाळी दारूच्या व्यवसायात गुंतलेले मोठे हस्ती आता तो धंदा बंद झाल्याने नव्या धंद्याच्या शोधात सुगंधित तंबाखूच्या व्यापाराकडे वळले आहे, त्यामुळे परंपरागत पद्धतीने हा व्यवसाय करून अन्न औषधी विभागाच्या व पोलिसांच्या तुंबड्या भरणाऱ्या जुन्या सुगंधित तंबाखू विक्रेत्या वसीमचा गेम करणे आवश्यक होते, त्यामुळे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने छडयंत्र रचून तो गेम स्थानिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून काही दिवसापूर्वी करण्यात आला व वसीम ला या प्रकरणात अटक करण्यात आली होती आणि आजही त्यांची जमानत झाली नसल्याचे बोलल्या जात आहे . मात्र हे सगळे छडयंत्र करणारा मोरक्या कोण? याबद्दल सुगंधित तंबाखू व्यापाऱ्यांमधे चर्चा सुरू असून वसीम चा गेम केल्यावर जयसूख मनसूख हरीश जितू व गुप्ताचा धंदा जोरात सुरू असल्याने अन्न औषधी प्रशासन विभागाने त्या मोरक्याच्या इशाऱ्यावर हा धंदा सुरू ठेवण्याची परवानगी दिली का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र त्या मोरक्याचा या खेळीतून त्याचा मनसुबा काय आहे हे स्पष्ट दिसत आहे.मात्र काही काळातच त्याचा पर्दाफाश होणार असल्याचे संकेत आहे.

सुगंधित तंबाखू विक्री प्रकरणात गुंतलेले काही व्यवसायी फरार झाले असल्याची चर्चा असून राजकीय वरदहस्त असलेल्या एका व्यक्तीच्या ईशाऱ्यावर वसीम ला सोडून गुप्ता चा साथ देण्यासाठी सांगण्यात आले असल्याचे बोलल्या जात आहे. यामधे नूतन नावाच्या व्यक्तीने ही खेळी केल्याची बाब चर्चेत आहे.दरम्यान सुगंधित तंबाखूच्या बेकायदेशीर धंद्यात कायदेशीर कारवाई करण्याच्या नावाखाली काही सुगंधित तंबाखू विकणाऱ्या व्यापाऱ्यांना सूट देऊन अन्न औषधी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आपली माल सूतो अभियानाची भूमिका मात्र कायम ठेवली आहे. आम्हच्याकडे अपुरे कर्मचारी आहे व जिल्ह्यात एवढ्या ठिकाणी पोहचणे अवघड आहे अशी नेहमी बोळवण करणाऱ्या अन्न औषधी प्रशासनाची भूमिका नेहमीच वादात राहिली असून त्यांच्या अपुऱ्या संसाधनाचा तेवढाच फायदा त्यांनी मोठ्या सुगंधित तंबाखू व्यापाऱ्यांकडून मोठा हप्ता घेण्यासाठी केला आहे. कारण त्यांच्या आशीर्वादाशिवाय जिल्ह्यात सुगंधित तंबाखू चा व्यापार चालणे शक्यच नाही.मात्र पत्रकारांना गुळगुळीत सांगून कोट्यावधी रुपयाच्या या धंद्यात अन्न औषधी प्रशासन विभागाचे अधिकारी लाखोंची माया मात्र जमा करण्यात यशस्वी होत आहे.

अन्न औषधी प्रशासनाची भूमिका व स्थानिक पोलीस प्रशासनाची कारवाई यामधे कोण काय आहे? व त्यांची यामधे काय खेळी आहे?हे स्पष्ट दिसत असलं तरी यामागे राजकीय किरदार निभावनारे  हस्ती पूर्णतया गेमप्लान करीत असून याचा उलगडा होणे आवश्यक आहे तेंव्हाच या अवैध सुगंधित तंबाखू च्या धंद्याला  आळा बसू शकतो एवढे मात्र खरे, विशेष म्हणजे त्याबद्दल येणाऱ्या काळात ती खळबळजनक बातमी दिसेल असे संकेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here