Home वरोरा धक्कादायक :- सख्खे भाऊ झाले वैरी, बायकांच्या भांडणात लहान भावांनी मोठ्या भावाला...

धक्कादायक :- सख्खे भाऊ झाले वैरी, बायकांच्या भांडणात लहान भावांनी मोठ्या भावाला पेटवले?

 

गडचांदूर परिसरातील चित्तथरारक घटना, चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्युशी झुंज सुरू.

गडचांदूर प्रतिनिधी :-

बायकांनी रामायण महाभारत घडवले आणि एकत्र कुटुंबात कलह निर्माण करून अख्खे कुटुंब आणि परिवार उध्वस्त केल्याचा इतिहास असताना आता कलियुगात बायकांनी भावाभावात भांडणे लावण्याची मनोवृत्ती सुरूच ठेवल्याची बाब गडचांदूर येथील मुक्तीधाम परिसरात घडली असून दोन सख्या लहान भावांनी वैरी ठरलेल्या मोठ्या भावास डिझेल टाकून पेटविले असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

आरोपी नामे रवी उर्फ रोहिदास रामजी मूनेश्वर (38), अमृत रामजी मूनेश्वर (30) यांनी मोठा भाऊ जयदेव रामजी मूनेश्वर (46) याला कौटुंबिक वादातून डिझेल टाकून पेटविल्याने ते गंभीर जखमी झाले दरम्यान जयदेवला उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले असल्याची माहिती आहे.

सदर घटना आज दिनांक २४ ऑक्टोबर ला रविवारी सकाळी 10 च्या दरम्यान घडली.आज सकाळी लहान मुलावरून आरोपी व जयदेवच्या बायकांमध्ये वाद झाला. त्याचा राग मनात ठेवून आरोपींनी जयदेव शेतातून आल्यावर त्याच्यावर डिझेल टाकून पेटविले. आरोपींना पोलीसांनी अटक केली असून कलम 307, 285, 34 कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सत्यजित आमले यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे तपास करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here