Home चंद्रपूर स्तुत्य उपक्रम ;- मनसेच्या मोफत रोगनिदान शिबीराला नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद.

स्तुत्य उपक्रम ;- मनसेच्या मोफत रोगनिदान शिबीराला नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद.

 

जनसेवेचे व्रत घेतलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांचे नागरिकांनी केले अभिनंदन आणि मानले आभार.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

कोरोना काळात झालेल्या भीषण संकटात मनसेचे पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांनी रुग्णाना मोठ्या प्रमाणात मदत करून त्यांची सेवा केली.आता ती परिस्थिती ओसरली असली तरी संभावित तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा नव्याने संकट उभे राहू शकते त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांचे आरोग्य सुदृढ राहावे या निस्वार्थ हेतूने मनसेचे जिल्हासचिव किशोरभाऊ मडगुलवार यांच्या संकल्पतेतून मनसे महिला सेना शहरउपाध्यक्षा सौ.वानीताई सदालावार यांच्या पुढाकारानी राज्यसरचिटणीस हेमंतभाऊ गडकरी यांच्या प्रमुख मार्गदर्शणात महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपूरच्या वतीने महाकाली कॉलरी येथे मोफत रोगनिदान व औषध वाटपाचे आयोजन करन्यात आले.

याप्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष श्री.दिलीपभाऊ रामेडवार तथा मनविसे जिल्हाध्यक्ष श्री.राहुलभाऊ बालमवार चंद्रपुर मनविसे तालुका अध्यक्ष विवेक घोटे यांच्या उपस्थीतीत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर,छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण तथा दिपप्रज्वलीत करून कार्यक्रमाचे रितसर उद्घाटन करून आरोग्य रोगनिदान शिबीराला सुरवात करन्यात आली या शिबीरात मधुमेह,रक्तदाब,दंत तपासनी अशा रोगांचे अचूक निदान करून त्यावर मोफत औषधउपचार करन्यात आले सदर शिबीराला तिनशे सतरा रुग्नांनी आपला सहभाग दर्शविला त्यांना योग्य मार्गदर्शण व औषधउपचार करन्यात आले याच आरोग्य शिबीराचे निमीत्ताने मनसेचे संस्थापक अध्यक्ष माननिय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरीत होऊन मनसेचे जिल्हासचिव किशोर मडगुलवार,मनसे महिलासेना शहर उपाध्यक्षा सौ.वाणिताई सदालावार यांच्या उपस्थीतीत महाकॉली कॉलरी येथीलअनेक युवकांनी मनसेचा झेंडा हाती घेत जाहिर पक्षप्रवेश केला या कार्यक्रमाला मनविसे चे जिल्हा उपाध्यक्ष कुलदिप चंदनखेडे मनसे रूग्ण मित्र क्रिष्णा गुप्ता रूग्ण मित्र प्रविन शेवते महेश गडपेलीवार सचिन गुप्ता शैलेश सदालावार रहीम शेख साहील खान रोशन काटकर इमरान शेख श्रीधर येलपुला नरेश सदालावार सगार गडपेल्लीवार नावेद शेख इत्यादी पदाधिकारी, व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleखळबळजनक :- पोंभुर्णा येथील 14 वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी आरोपींची संख्या वाढणार?
Next articleअत्यंत महत्वाची बातमी – महाराष्ट्र सरकारनं दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा केल्या जाहीर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here