Home महाराष्ट्र अत्यंत महत्वाची बातमी – महाराष्ट्र सरकारनं दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा केल्या जाहीर.

अत्यंत महत्वाची बातमी – महाराष्ट्र सरकारनं दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा केल्या जाहीर.

 

या महिन्यात होणाऱ्या परीक्षा ऑनलाईन कि लेखी? याबद्दल शिक्षणामंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा.

मुंबई न्यूज नेटवर्क :-

येत्या मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी व बारावी च्या परीक्षा घेण्याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी  तारखांची घोषणा केली आहे. ऑनलाईन पद्धतीने बारावीची लेखी परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीमध्ये होईल, तर दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल या कालावधीत होणार आहे.

परीक्षेविषयी माहिती देताना वर्षा गायकवाड यांनी म्हटलं, “ओमिक्रॉन संदर्भात आपण सातत्यानं मॉनिटरिंग करत आहोत. हे करत असताना दहावी आणि बारावी हे विद्यार्थी आणि पालकांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं वर्षं असतं. बारावीची लेखी परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीमध्ये होईल. तर दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल या कालावधीत होणार आहे.

याव्यतिरिक्त बारावीच्या प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत होणार आहे, तर दहावीच्या परीक्षा 25 फेब्रुवारी ते 14 मार्च या कालावधीत होणार आहे.” या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत. मागील काळात जसे पेपर घेत होतो, तशाच पद्धतीनं परीक्षी घेतली जाणार आहे,” असंही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here