Home धक्कादायक धक्कादायक :- वाघाने एका शेतकऱ्याला ठार मारून त्याचे धडावेगळे केले शरीर.

धक्कादायक :- वाघाने एका शेतकऱ्याला ठार मारून त्याचे धडावेगळे केले शरीर.

 

चिमूर तालुक्यातील धक्कादायक घटना. शरीराचे केले अनेक तुकडे परिसरात भीतीचे वातावरण.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चिमूर तालुक्यात असलेल्या शेतातील प-हाटीत असलेले गवत कापण्यासाठी गेलेल्या शेतक-याला दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने हल्ला करून ठार केल्यानंतर त्याचे डोके, हात, पाय धडापासून वेगळे करीत शरीराच्या पोटाचा भाग खाऊन टाकला असल्याची धक्कादायक घटना समोर आली असून देविदास महादेव गायकवाड (वय ४०) रा. सोनेगाव बेगडे (चिमूर) असे मृत शेतक-याचे नाव आहे. त्याच्या धडापासून वेगळे झालेले अवयव वनविभागाने वेगवेगळ्या शेतातून ताब्यात घेतले आहे. घटनेची भिषणता लक्षात घेता चिमूर, सोनेगाव परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार चिमूर शहरापासून अवघ्या तीन किमी अंतरावर सोनेगाव बेगडे हे छोटेसे गाव आहे. देविदास महादेव गायकवाड (वय ४०) हा शेतकरी तेथील रहिवासी होता. सदर शेतक-याची शेती चिमूरला वरोरा मार्गावर पाॅवर प्लांट जवळ लागून आहे. त्याने शेतात यावर्षी प-हाटीची लागवड केली आहे. सहा ते सात फूट उंच असलेल्या पिकाची देखरेख तो दररोज शेतात जावून करीत होता. शिवाय प-हाटीत वाढलेले तन (गवत) काढत होता. काल गुरूवारी (16 डिसेंबर)ला सकाळी दहाच्या सुमारास तो शेतात पथकातील गवत काढण्यासाठी गेला होता.

शेतातील पिक उंच असल्याने पिकात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाचा त्याला जराही मागोसा आला नाही. त्यामुळे वाघाने त्याला प-हाटीतच ठार केले. त्यामुळे सदर शेतकरी हा सायंकाळी घरी परत आला नाही. रात्र होवूनही घरी न परतल्याने म्हातारी आई आणि भाऊ यांनी, आपल्या काही नातेवाईकांसोबत शेतात जावून शोधण्याचा प्रयत्न केला पण रात्रीची वेळ असल्याने त्याचा शोध लागला नाही.

दिवसाच शेतक-याला वाघाने ठार केल्याने आणि शरीराचा बराचसा भाग खाऊन टाकला. डोके, हात, पाय धडापासून वेगळे करून घटनास्थळापासून अन्य दोन शेतकऱ्यांच्या शेतात नेऊन टाकले. परत आज शुक्रवारी 17 डिसेंबर) ला सर्व प्रथम पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली. तर नातेवाईकांनी पुन्हा सकाळपासून शेतक-याची शोधमोहीम सुरू केली. शेतात माणूसभर उंच असलेल्या प-हाटी पिकात घुसून पहाणी केली असता मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आले. त्याच्या शेतात शरीराचा काही भाग तर अन्य दोन शेतकऱ्यांच्या शेतात धडापासून वेगळे केलेले शरीराचे अवयव आढळून आले.

या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असता वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसा आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी डोके, हात, पाय आणि धड वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेतले. भितीमय वातावरणात मृतदेहाचे तुकडे तुकडे गोळा करून उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आले आहे. सदर शेतक-याच्या वाघाच्या ह्यातील ठार केल्याचे हे दृश्य बघून प्रचंड भितीमय वातावरण निर्माण झाले होते. वनविभागाने सदर घटनास्थळ पहाणी केली असता वाघाच्या पायाचे पगमार्क आढळून आले आहे. विशेष म्हणजे शेतक-याला ठार केल्यापासून तर रात्रभर त्याच ठिकाणी वाघाने मुक्काम ठोकून शरीराला पूर्णत: खाऊन टाकल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.दरम्यान मृतकांच्या परिवाराला शासनाकडून कुठलीही मदत दिल्ता गेली नसल्याची चर्चा आहे.

Previous articleअत्यंत महत्वाची बातमी – महाराष्ट्र सरकारनं दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा केल्या जाहीर.
Next articleलक्षवेधी :- रुपालीताई निष्ठा कशी असतें ती आम्हच्या सन्माननीय बाळा नांदगावकर यांच्यापासून शिका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here