Home मुंबई लक्षवेधी :- रुपालीताई निष्ठा कशी असतें ती आम्हच्या सन्माननीय बाळा नांदगावकर यांच्यापासून...

लक्षवेधी :- रुपालीताई निष्ठा कशी असतें ती आम्हच्या सन्माननीय बाळा नांदगावकर यांच्यापासून शिका.

 

उगाच पक्षातील नेत्यांना दोष देऊन आरोपांचे इमले बांधू नका.

लक्षवेधी:-
(संपादक राजू कुकडे)

पुण्याच्या माजी शहर अध्यक्षा तथा मनसेच्या राज्य उपाध्यक्षा रुपालीताई ठोंबरे यांनी पक्षाच्या पदांचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आणि मनसे पक्षात आपली कशी गळचेपी होत होती याचा पाढा वाचला. खरं तर रुपालीताई यांना मनसे पक्षांनी ओळख करून दिली आहे व त्यांनी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरेयांच्या उतुंग नेत्रूत्वाच्या जादूने समाजात जी आस्था आहे त्याचा वापर करून आपलं नाव कमावल आहे पण आता राष्ट्रवादी पक्षाच्या काही नेत्यांनी काही ऑफर दिली असावी, जी नेहमीच इतर पक्षातील नेत्यांना वेळोवेळी राष्ट्रवादी कडून दिली जाते. त्या ऑफर मधे अडकून रुपालीताई यांनी राजकीय करियर मिळवून देणाऱ्या मनसे पक्षासोबत गद्दारी केली. आता त्या घटनेची निंदा महाराष्ट्र सैनिक सामाजिक माध्यमावर करत आहे जी स्वाभाविक आहे, कारण मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी त्यांना पक्षात पुणे शहर अध्यक्षा ते राज्याची उपाध्यक्षा असा मान दिला, विधानपरिषदेची उमेदवारी दिली एवढेच नव्हे तर पक्षाची प्रवक्ता म्हणून वेळोवेळी त्यांना प्रसारमाध्यमांवर पक्षाची भूमिका मांडण्याची संधी पण दिली,मग एवढ सगळं भरभरून दिल्या नंतर केवळ स्थानिक मनसे पदाधिकारी यांच्यासोबत जमत नाही म्हणून त्यांनी पक्ष सोडला असेल तर त्यांनी एकदा मनसे नेते बाळा नांदगावकर यांची पक्षनिष्ठा एकदा समजून घ्यावी. कारण स्वतः मागील निवडणुकीत राजसाहेब ठाकरे हे एकटे प्रचार करणार व त्यामुळे निवडणूक प्रचाराचा ताण एकट्या राजसाहेब ठाकरे यांच्यावर पडणार म्हणून त्यांनी राजसाहेब ठाकरे यांना साहेब,मी निवडणूक नाही लढणार म्हणून गळ घातली. पण ह्याच रुपालीताई यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्या रूसल्या होत्या व राष्ट्रवादी च्या नेत्यांना भेटल्या होत्या ही वस्तुस्थिती आहे.

मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या विषयी पसरवले जात आहे भ्रम.

मागील काही दिवसांपासून काही स्वयंघोषित सूत्रांनी बाळा नांदगावकर यांचा पक्षत्याग व परस्पर पक्ष प्रवेशाची बातमी सुद्धा चालवली. सोशल मीडियाच्या युगात अशा बातम्या किती जोरदार पसरतात हे न बोललेच बरे. त्यातही मागील अनेक वर्षांत राजकारणात पक्षनिष्ठा, व्यक्ती निष्ठा हे विषय गौण होऊन फक्त आणि फक्त स्वतःच्या फायद्यासाठी वरचेवर पक्ष बदलणारे अनेक नेते असले तरी सगळेच असे नसतात.त्यात बाळा नांदगावकर यांनी राजसाहेब ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून पक्षाचा प्रचार प्रसार करण्यासाठी महत्वाची भूमिका निभावली ते पक्षाशी गद्दारी करेल हे शक्य नाही आणि त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर आपली भूमिका स्पष्ट करतांना म्हटले आहे की “तेरे नाम से सुरू, तेरे नाम पे खतम.” म्हणजे ते राजसाहेब ठाकरे यांच्याशी शेवटच्या क्षणापर्यंत सोबत राहणार आहे. अर्थात रुपालीताई यांनी जर मनसे नेते नांदगावकर यांची पक्षनिष्ठा जर एकदा समजून घेतली असती तर त्यांना सामाजिक माध्यमावर असं अपमानित व्हायची वेळ आली नसली.

मुंबई येथील अनेक नेत्यांचे एकमेकांशी जमत नाही पण म्हणून मुंबई मधील कोणी नेता पक्ष सोडत नाही, कारण ते आपापल्या परिसरात व क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करतात.उदाहरण द्यायचे झाल्यास मनसे वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांच्याशी मनसे नेते बाळा नांदगावकर यांचे जमत नाही पण म्हणून त्यांनी राजसाहेब ठाकरे यांच्याकडे तक्रारी केल्या नाही पण पक्षात एवढी मोठी संधी मिळाल्यानंतर रुपालीताई पक्षाच्या स्थानिक नेत्यांना दोष देत पक्ष सोडून इतर पक्षात जातात म्हणजे त्यांची पक्षांवर निष्ठा नव्हती तर व्यक्तिगत स्वार्थासाठी पक्षासोबत त्यांनी गद्दारी केली हे स्पष्ट होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here