Home चंद्रपूर मनसे सरचिटणीस गडकरी यांच्या आशीर्वादाने वसुली करणाऱ्या मनदीप रोडेचा बंदोबस्त करा.

मनसे सरचिटणीस गडकरी यांच्या आशीर्वादाने वसुली करणाऱ्या मनदीप रोडेचा बंदोबस्त करा.

मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांची पक्षाचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे व पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांच्याकडे मागणी

चंद्रपूर :-

एकीकडे जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडविण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्यासह पक्षाचे नेते व पदाधिकारी धडपड करताहेत तर दुसरीकडे पक्षाचे सरचिटणीस हेमंत गडकरी यांचे खास विश्वासू असलेले मनदीप रोडे हे पदाचा गैरवापर करून केवळ पैसे कमविन्याचा गोरखधंदा चालवीत आहे. त्यामुळे जनतेत चुकीचा संदेश जावून पक्षासोबत जुळलेले कार्यकर्ते सुद्धा दूर जात आहे. त्यामुळे अशा मनदीप रोडेमुळे पक्ष बदनाम होण्याची दाट शक्यता असल्याने त्याचा त्वरित बंदोबस्त करा अशा मागणीचे निवेदन वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी पक्षाचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे व पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

राजू कुकडे यांनी निवेदनात म्हटले आहे की मागील विधानसभेच्या निवडणुकीत वरोरा विधानसभा क्षेत्राचे उमेदवार रमेश राजूरकर यांनी तब्बल 35 हजार मते घेऊन काँग्रेस शिवसेना उमेदवारांना जोरदार टक्कर दिली होती. त्यावेळी मी स्वतः प्रचाराची प्रमुख धुरा सांभाळून अहोरात्र परिश्रम घेतले होते. त्यावेळी पक्ष संघटनेची अगदी दोन महिन्यापूर्वी मी जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी घेतली असल्याने व पक्ष संघटनात्मक द्रुष्टीने बळकट नसल्याने आपला उमेदवार प्रमुख लढतींमधे हरला पण आम्ही हरल्याचानंतर सुद्धा पुन्हा जोमाने कामाला लागलो आणि वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात गाव तिथे मनसे शाखा हा संकल्प घेऊन पक्ष बांधणी सुरू केली. दरम्यान चंद्रपूर मनसे शहर अध्यक्ष मनदीप रोडे ज्यांना मनसे सरचिटणीस यांचे पाठबळ आहे त्यांनी आम्ह्च्या या विधानसभा क्षेत्रातील कंपन्यात व येथील आमदार खासदार यांना निवेदने देऊन मीच पक्षाचा नेता म्हणून म्हणून आपला वचक निर्माण करण्याचा प्रयत्न चालवून स्थानिक पदाधिकारी यांच्यात संभ्रम निर्माण केला आहे.

मनदीप रोडे याचा इतिहास बघितला तर त्याचा एक भाऊ शिवसेनेत, दुसरा काँग्रेस आणि चवथा भाजप मधे आहे आणि त्यांनी मनसे कडून शहर अध्यक्ष असताना कधी निवडणूक लढवली नाही किंव्हा मनसे उमेदवारांचा कधी प्रचार केला नाही, हा व्यक्ती सन २०१४ च्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवार सौ सुनीता गायकवाड यांच्या प्रचारात कधी दिसला नाही तर तो भाजप उमेदवार नाना शामकुळें यांच्या प्रचार कार्यालयात काम करत होता ही वस्तुस्थिती आहे. पण मनसे सरचिटणीस हेमंत गडकरी यांचा खास जवळचा म्हणून त्याला जिल्हाभर फिरण्याची व वाट्टेल ते करण्याची मुभा देण्यात आली आहे. या संदर्भात वेळोवेळी जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार, प्रदेश उपाध्यक्ष अतुल वांदिले व सरचिटणीस हेमंत गडकरी यांना वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात मनदीप रोडेचा हस्तक्षेप बंद करण्याची विनंती केली. मात्र कुणीही त्याच्यावर प्रतिबंध लावायला तयार नसून यामुळे वरोरा विधानसभा क्षेत्रातील मनसे पदाधिकारी कार्यकर्ते संभ्रमात आहे, एवढेच नव्हे तर पक्षात समन्वय नसल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे भावी आमदार म्हणून ज्यांच्याकडे बघितल्या जाते ते रमेश राजूरकर हे सुद्धा अस्वस्थ आहे. त्यामुळे वरोरा विधानसभा क्षेत्रात पक्षाचा आमदार निवडून येण्यासाठी अनुकूल वातावरण गावागावात शाखांच्या माध्यमातून निर्माण झाल्याने आपण विदर्भात मनसेचा फिक्स आमदार म्हणून रमेश राजूरकर यांच्याकडे पाहत आहो पण पैसे वसुली करिता पक्षाचे सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी मनदीप रोडेला वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात पाठवून पक्षाचे संघटन खिळखिळे करण्याचा प्रयत्न चालविला आहे त्यामुळे मनदीप रोडेचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी पक्षाचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे व पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांच्याकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here