कंपनीच्या संचालक व अधिकाऱ्यांना सहकार्य करणाऱ्या गुंडांवर पण होणार मनसे वार?
चंद्रपूर प्रतिनिधी :-
चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात ग्राहकांकडून विविध आमिषे दाखवून कोट्यावधीची गुंतवणूक करून घेणाऱ्या व मागील तीन वर्षापासून गुंतवणूकदाराना थकीत पैसे न देता पोबारा करणाऱ्या कलकामच्या संचालकांना धडा शिकविण्यासाठी कंपनीच्या गुंतवणूकदारानी मुंबई गाठून मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा दरवाजा ठोठावल्याने आता त्या कंपनीच्या संचालक,व्यवस्थापक यासह त्यांना साथ देणाऱ्या गुंडांना मनसे स्टाईल धडा शिकवला जाईल अशी दाट शक्यता असून या संदर्भात संबंधित कंपनी संचालक पदाधिकारी व त्यांना साथ देणाऱ्या त्या गुंडांवर सुद्धा गुंतवणूकदार सरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल होण्याची शक्यता बळावली आहे. यामधे कलकाम कंपनीचे चेअरमन विष्णू पांडुरंग दळवी. संचालक विजय सुपेकर, सुनील वांद्रे यांच्यासह विदर्भाचे विदेश रामटेके, विजय येरगुडे व यांना साथ देणाऱ्या गुंडावर सुद्धा गुन्हा दाखल होऊन कारवाई होणार असल्याचे संकेत मिळत आहे.
कलकाम या वित्तीय गुंतवणूकदार कंपनीने चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो ग्राहकांकडून कोट्यावधी ची गुंतवणूक करून घेऊन तो पैसा मुंबई सारख्या मोठ्या शहरात नेला व जेंव्हा गुंतवणूक दारांचे पैसे मुदतीत देण्याची वेळ आली तेंव्हा स्थानिक कलकामचे अधिकारी पदाधिकारी व संचालक हे रफू चक्कर झाले,दरम्यान आपल्याला पैसे मिळणार नाही हे समजल्यावर ग्राहकांनी चंद्रपूर कार्यालयात पायऱ्या झिजविल्या पण फायदा झाला नाही तर तिथे त्या कलकाम च्या संचालक व अधिकारी यांच्या संरक्षणाची जबाबदारी काही राजकीय गुंडांना भाड्याने ठेऊन करण्यात आल्याने पैसे मागण्यासाठी आलेल्या ग्राहकांना त्या गुंडांनी हुसकावून लावले. आता सर्व पर्याय संपल्याने शेवटी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबई येथील विरार भागातील पदाधिकारी संजय जाधव व सूर्यवंशी यांच्याकडे कलकाम चे ग्राहक यांनी धाव घेतली व मनसेच्या या पदाधिकाऱ्यांनी कलकाम च्या फसवणुकीच्या धंद्याची चौकशी करून हे प्रकरण मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्याकडे नेले. राजसाहेब ठाकरे यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकरणाची चौकशी मनसे संपर्क अध्यक्ष नंदकिशोर घाडी यांच्याकडे दिले. त्यांची आता या प्रकरणी चौकशी सुरू असून कलकाम च्या सर्व गुंतवणूकदार यांना कसे पैसे मिळवून देता येईल याबाबत मुंबई स्थरावर सुरू आहे.
मुंबई मनसे पदाधिकारी संजय जाधव व सूर्यवंशी यांचा दानशूरपणा ?
चंद्रपूर जिल्ह्यातून मुंबई मधे गेलेल्या कलकाम च्या ग्राहकांना रहायला व दोन वेळेचे खायला जेवण मिळणे बंद झाल्याने अतिथि देवो भव या वाक्याला सार्थक करत मनसे पदाधिकारी यांनी या ग्राहकांची राहण्या व खाण्याची पूर्ण व्यवस्था करून त्यांना एक प्रकारे संकटकाळी मदत करून मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या खऱ्या विचरांना सार्थक केले. व आलेल्या लोकाना कंपनीच्या कार्यालयात नेऊन तिथे कलकाम कंपनीच्या संचालकांना विचारना करून दमदाटी केली व आलेल्या ग्राहकांचे पैसे परत करण्याची तारीख घेतली
दोन वर्षापूर्वी कलकाम च्या एजंटचा ह्रुदयविकाराच्या झटक्याने मृत्यु?
कलकाम कंपनीच्या संचालकांनी ग्राहकांचे पैसे परत न केल्यामुळे ग्राहकांनी एजंट यांना धमकावून पैसे परत करण्याचा तगादा लावला होता मात्र मूद्दत संपल्यानंतरही एजंट लोकांना सुद्धा जेंव्हा रक्कम परत करण्याची वेळ आली तेंव्हा कंपनी व्यवस्थापनाने काही भाडोत्री गुंडाकडून एजंट व ग्राहकांना धमकावने सुरू केले, यामधे या कंपनीचे एजंट संकटात होते अशाच एका गणेश काविटकर नावाच्या एजंटला व ग्रुप लीडरला सुद्धा त्यांच्या ग्राहकांना पैसे परत मिळणार नाही अशा धमक्या काही भाडोत्री गुंडाकडून त्यांना मिळाल्याने त्यांचा धक्क्याने दिनांक 19 फरवरी 2020 ला त्याचा आकस्मिक म्रुत्यु झाला, तूकूम येथील ग्रुप लीडर म्हणून या कंपनीत कार्यरत असणारे गणेश काविटकर त्यांनी मार्केटमधे ९० लाखाचे चेक स्वतःचे दिले होते, मात्र कंपनी कडून ग्राहकांच्या पैशाची कुठलीही शाश्वती मिळाली नसल्याने एवढेच नव्हे तर कंपनीच्या भाडोत्री गुंडांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने पूर्णतः घाबरलेले गणेश यांना मोठा धक्का बसला व त्यातच त्यांचा आकस्मिक म्रुत्यु झाला,
कलकाम सोबत दुसरी कंपनी स्थापून पुन्हा लूट .
विदेश रामटेके संचालक असलेल्या कलकाम या कंपनीचे मुंबई वाशी येथे असलेले कार्यालय बंद झाले असून त्यांनी तनिष्का मल्टी अग्रॉ सर्वीसेस या नावानी दुसरी कंपनी खोलुन त्यातून सुद्धा ग्राहकांची लूट चालवली होती, विदर्भातून या कंपनीमधे गुंतवणूकदारांची संख्या दहा हजारच्या वर गेली असल्याने व कंपनी ग्राहकांचे पैसे परत न देता काही भाडोत्री गुंडाकडून ग्राहकांना धमकावीत असल्याने ग्राहक पोलिस तक्रार करण्यासाठी पुढे येत नसल्याची माहिती आहे. मात्र या कंपनीच्या विदेश रामटेके या संचालकांची पोलिस विभागाने चौकशी केल्यास दुर्दैवी म्रुत्यु झालेल्या गणेश काविटकर यांच्या म्रुत्युचे रहस्य उलगडू शकते.