कंत्राटदार व अधिकारी यांच्या संगनमताने ७० लाखांचा घोळ कोणत्या नियमांत?
चंद्रपूर प्रतिनिधी :-
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या युनिट क्रमांक ८ च्या टरबाईन MDPP stainer लिकेज झाल्याने मोठे नुकसान झाले व त्यात त्या ८ क्रमांकाच्या युनिट ला बंद करावे लागले विशेष म्हणजे त्याच्या मेन्टनन्स करिता जवळपास ७० लाख रुपयाचे कंत्राट काढावे लागले. पण महत्वाची बाब ही आहे की ज्या युनिट क्रमांक ८ चे मेन्टेनन्सचे काम अगोदरच एका कंपनीला देण्यात आले होते. त्या कंत्राटी कंपनीने ते काम व्यवस्थित केले नाही त्यामुळेच या युनिट मधे बिघाड आली तर मग त्या नियमित मेंटेनन्स करणाऱ्या कंत्राटी कंपनीवर का कारवाई करण्यात आली नाही? हा महत्वाचा प्रश्न उभा ठाकला आहे त्यामुळे या बिघाड झालेल्या युनिट क्रमांक ८ ची चौकशी झाल्यास यामागील रहस्य समोर येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार युनिट क्रमांक ८ चे मेन्टनेन्स चे कंत्राट अगोदरच चोरीचा आरोप असणाऱ्या भावना कन्स्ट्रक्शन या कंपनीला मिळाले असल्याने या कामात गडबडी होण्याची दाट शक्यता आहे. विशेष सूत्रांच्या माहितीनुसार या युनिट क्रमांक ८ च्या मेन्टनेन्सचे काम दरवर्षी होत असते ते वार्षिक मेन्टेनन्सचे काम याही वर्षी असणार होते पण त्या अगोदरच तब्बल ७० लाखांचे मेन्टेनन्सच्या नांवावर भावना कंपनीला काम देण्यात आल्याने यामधे मोठी डील झाल्याचे संकेत मिळत आहे.
कंपनी अधिकारी यांच्या संगनमताने सिटिपिएसचा विद्युत निर्मिती प्रकल्प हा तोट्यात जाण्याची चिन्हे दिसत असली तरी यामधे सुधारणा होईल याची तूर्तास शक्यता नाही.कंपनी च्या मुख्य अभियंत्यांने या संदर्भात काय पाऊले उचलली याचा लेखाजोखा जर घेण्यात आला तर खऱ्या अर्थाने सिटिपिस कंपनीत होणार भ्रष्टाचार लपवीला जात असल्याचे दिसत आहे.
कोट्यावधीचा कोळसा घोटाळा पण होणार उघड ?
सिटिपिएस मधे येणारा वेगवेगळ्या पद्धतीने कोळसा हा भ्रष्टाचाराचे कुरण बनला असून यामधे मुख्य अभियंता यासह वेकोली अधिकारी व ट्रान्सपोर्टर यांचा सहभाग असल्याची मोठी बातमी समोर येत येणार असल्याने सिटिपिएस प्रशासन भ्रष्टाचाराच्या विळख्यात असल्याचे दिसत आहे.