Home भद्रावती हल्ला :- बीजोनी गावातील शेतशीवरात जनावरावर केला वाघाने हल्ला.

हल्ला :- बीजोनी गावातील शेतशीवरात जनावरावर केला वाघाने हल्ला.

एकाचा मृत्यु तर बाकी जनावरांनी पळ काढला.

भद्रावती प्रतिनिधी :-

तालुक्यात शेतकऱ्यांना वाघाची मोठी दहशत असून जनावरांना वाघ लक्ष करत आहे अशीच एक दुर्दैवी घटना आज दुपारी विठ्ठल रोडे राहणार बीजोनी पोस्ट सागरा ता भद्रावती यांच्या शेतात घडली असून नेहमीच्या जागेवर जनावरे बांधून असताना अचानक वाघाने हल्ला करून एका जनावराला जागीच ठार केले आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या कडून पाहिजे त्या प्रमाणात वाघांच्या परिसरात दक्षता घेतली जात नसल्याने दिवसेंदिवस वाघांचे माणसांवर व पाळीव प्राण्यांवर हल्ले होत आहेत. आज झालेल्या जनावरांवरील हल्ल्याची दखल वनविभागाने घेऊन शेतकऱ्यांना व त्यांच्या पाळीव जनावरांना सुरक्षा प्रदान करावी अशी मागणी होत आहे.

Previous articleकॅन्सरग्रस्त वृध्द महिलेला आर्थीक मदत. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा स्तुत्य उपक्रम
Next articleवरोरा तालुक्यातील एकोना वेकोली कोळसा खाणीत स्थानिक भुमिपुत्राना रोजगार द्या अन्यथा खळखट्ट्याक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here