Home वरोरा वरोरा तालुक्यातील एकोना वेकोली कोळसा खाणीत स्थानिक भुमिपुत्राना रोजगार द्या अन्यथा खळखट्ट्याक.

वरोरा तालुक्यातील एकोना वेकोली कोळसा खाणीत स्थानिक भुमिपुत्राना रोजगार द्या अन्यथा खळखट्ट्याक.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला इशारा.

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा तालुक्यात असलेल्या वर्धा पॉवर, जिएमआर व एकोना वेकोली कोळसा खान प्रकल्प येथे मोठ्या प्रमाणात बाहेरील प्रांतातील कर्मचारी, अधिकारी व कामगार आणून स्थानिक भुमिपुत्राना जाणीवपूर्वक डावलल्या जात आहे. बाहेरील प्रांतातील इथे येणाऱ्या कामगारांचे पोलीस वेरिफीकेशन न करता त्यांना येथील उदयोगात नौकरीत सामावून घेण्यात येते व कालांतराने तेच परप्रांतीय लोक चोऱ्या करतात व गुंडागिरी करतात कारण काही परप्रांतीयांचे त्यांच्या प्रांतात पोलीस रेकार्ड हा गुन्हेगारीचा असतो पण तरीही या गंभीर प्रश्नाकडे कुणीच लक्ष देत नाही.

या प्रकरणी स्थानिक लोकप्रतिनिधी व राजकारणी फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी या परिसरातील स्थानिक प्रकल्पग्रस्त व बेरोगार युवकांवर अन्यायच करत आहे. ज्या परिसरात उदयोग प्रकल्प असतात त्या परिसरातील गावाच्या तरुण बेरोजगार व प्रकल्पग्रस्तांना त्या प्रकल्पात नौकरीत घेण्याचे प्रावधान असतांना वरोरा तालुक्यातील या तीनही प्रकल्पात बाहेरील प्रांतावर कामगार अधिकारी व कर्मचारी आणून जाणीवपूर्ण स्थानिक मराठी भुमिपुत्राना डावलल्या जात आहे. त्यामुळे स्थानिक मराठी भुमिपुत्राच्या हक्कांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढा उभारणार असून शासन प्रशासनाने त्वरित या प्रश्नाला सोडवावे अन्यथा मनसे तर्फे खळखट्ट्याक आंदोलन करण्यात येईल अशा प्रकारचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्या नेत्रूत्वात उपविभागीय अधिकारी शिंदे यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. याप्रसंगी तालुका सचिव कल्पक ढोरे, उपाध्यक्ष प्रशांत बदकी मनविसे जिल्हा उपाध्यक्ष मुज्जमील शेख व इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही सदैव स्थानिक मराठी भुमीपुत्राच्या हक्क अधिकारांसाठी लढत असल्याने वरील कंपन्याच्या तानाशाही धोरणाविरूध्द लढा उभारण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने कायदा सुव्यवस्था अबाधीत राहावी व स्थानिक भुमिपुत्राना त्यांच्या हक्काचा रोजगार मिळावा म्हणून तीनही कंपन्याच्या व्यवस्थापनासोबत चर्चा करून सदर कंपन्यात किती स्थानिक भुमिपुत्रांना नौकन्या दिल्या व बाहेरील प्रांतातील लोकांना इथे संधी दिली त्याची माहिती जनतेसमोर आणण्यात यावी, सोबतच त्यांचे पोलीस वेरिफिकेशन करण्यात आले नसेल तर त्यांना इथून हाकलून द्यावे, या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी यांच्यासह स्थानिक बेरोजगार युवकांचे शिष्टमंडळ यांच्या समक्ष प्रशासनाने बैठक बोलावून या उदयोग व्यवस्थापनात स्थानिक तरूण बेरोजगार यांना त्यांच्या हक्काचा रोजगार मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थानिक भुमिपुत्राच्या हक्कासाठी खळ- खट्टयाक आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here