Home वरोरा सामाजिक कार्यकर्त्या रंजना पारशिवे यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना मिळवून दिली मदत.

सामाजिक कार्यकर्त्या रंजना पारशिवे यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना मिळवून दिली मदत.

शेतकरी मुलाच्या आई ताराबाई थेरे ला 1 लाखाचा चेक देऊन केले सांत्वन.

वरोरा प्रतिनिधी :-

खेड्यात शेतकरी कर्जाच्या बोझ्याखाली दबून आत्महत्या करतात पण त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना ज्या संकटाचा आणि परिस्थितीचा सामना करावा लागतोय ते अत्यंत दुःखद असून अशा दुःखात आणि संकटात जो मदतीचा हात देतो तोच खऱ्या अर्थाने देव असतो अशाच एका समाजसेवीका असलेल्या रंजना पारशिवे यांनी ताराबाई थेरे कुटुंबीयांना मदतीचा हात देत घराच्या कमावत्या त्यांच्या शेतकरी मुलांच्या आत्महत्या प्रकरणी काल वरोरा तहसील कार्यामध्ये ताराबाई थेरे यांना एक लाखा चा चेक मिळवून दिला.

काही महिन्यापूर्वी यांच्या मुलाने शेती कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्या मुलाच्या आई ताराबाई थेरे यांना समजसेवीका रंजना पारशिवे यांनी कागदपत्र तयार करायला लावली व त्यानंतर ती केस सबमिट केली व त्यांना शासनाच्या योजनेचा फायदा मिळवून दिला. खरं तर ताराबाई थेरे काकूंच दुःख यामुळे कमी होणार नाही. पण त्यांच्या संसारात थोडाफार हातभार होणार अशा आशेनी मी ते काम केलं आणि मला असं वाटतं जेव्हा आम्ही अशा गोरगरीब निराधार महिलांना मदत करतो त्यांना शासनांच्या योजनांचा कुठलीही माहिती राहत नाही. आणि आपण जर त्यांना माहिती देऊन त्या योजना मिळवून दिल्या तर आपण खऱ्या अर्थाने सावित्रीच्या लेकी आहोत असं मला वाटतं असे वक्तव्य रंजना पारशिवे यांनी या प्रसंगी केले. आज पर्यंत खेड्यापाड्यातील आणि वार्डातील शंभर ते दीडशे महिलांना मी या सर्व योजनांचा लाभ मिळवून दिला व समोर सुद्धा मी देईल अशी ग्वाही सुद्धा त्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here