Home चंद्रपूर अन…विखुरलेल्या मित्रांनी स्नेह मिलन सोहळ्यात तब्बल 20 वर्षानी केला एकच जल्लोष.

अन…विखुरलेल्या मित्रांनी स्नेह मिलन सोहळ्यात तब्बल 20 वर्षानी केला एकच जल्लोष.

आदिवासी विकास विभाग नागपूर उपायुक्त दशरथ कुळमेथे यांनी गाजवली मित्रांची मैफिल.

चंद्रपूर (गांधी बोरकर ):

काही महिन्यापूर्वी सामाजिक माध्यमावर मित्राच्या प्रेमा विषयी “दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामधे गारव्या सारखा.” असं मैत्री वरच गाणं सुपरहिट झालं होतं आणि अनेकांनी ते मित्रांच्या मैफिल मधे गायले सुद्धा, पण तब्बल 20 वर्षानंतर बिछ्डलेल्या मित्रांनी नववर्षानिमित्य एकत्र येऊन जो जल्लोष केला व आपल्या मनमोकळेपणाने ज्या भावना व्यक्त केल्या त्या खरोखरच उपस्थित सर्व मित्रांच्या मनाला गारवा देऊन गेल्या. मित्र कसाही असो पण त्याच्यासोबत घालवलेल्या क्षणाला कुणीही कधीही विसरू शकत नाही,कारण मैत्री ही अशी सामाजिक एकवाक्यता आहे जिथे स्वार्थ नसतो तर एक दुसऱ्याप्रती असते ती सवेंदना.

प्रसंग होता नववर्षाच्या पहिल्या दिवसाचा, कार्यक्रम होता मित्रांचा स्नेहमिलन सोहळा, स्थळ होते नागभीड तालुक्यातील चिखलपरसोडी आणि जमले होते तब्बल 20 वर्षापासून बिछडलेले मित्र, मग गंमती जमती होणारच आणि अरे तू हल्ली काय करताहेत? तुझं चाललंय तरी काय? अशा प्रश्नांच्या शरबती होणारच आणि त्या झाल्या पण. यामधे उपस्थित प्रत्त्येक मित्र आपल्या कुवतीनुसार आपापल्या क्षेत्रात प्रावीण्य मिळविलेल्या होत्या,

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कोरोना मध्ये मूत पावलेल्या कोरोना यौध्दा मित्रांना मानवंदना व भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून समाजकार्य महाविद्यालय चिमुर चे माजी प्राचार्य डॉ. प्रा.संजय पीठाले तर प्रमुख पाहुणे म्हणून आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमुरचे डॉ. प्रा.राजु कसारे, अवार्ड संस्था नागभीडचे माजी सहसचिव तथा आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमुरचे डॉ. प्रा. गजानन बनसोडे, आदिवासी विकास विभाग नागपूर उपआयुक्त दशरथ कुळमेथे, महाराष्ट्र राज्य नरेगा कर्मचारी संघटना राज्य संघटक तथा पत्रकार गांधी बोरकर, जिल्हा परिषद चंद्रपूर स्वच्छता तंत्रद्य प्रकाश उमक, घोडाझरी अभयारण्य प्रकल्प संचालक किशोर बनसोड, पॅरा मेडिकल कुष्ठरोग वर्कर वडसा दिनकर संदोकर, पॅरा मेडिकल कुष्ठरोग वर्कर उमरेड मारोती ठाकरे, पॅरा मेडिकल कुष्ठरोग वर्कर आरमोरी विनोद ठेंगरी, ग्रामीण जीवनोत्ती अभियान समुपदेशक बाबा लिंगायत, धानोरा तालुका समन्वयक सुरेश घोडेस्वार, पोलीस स्टेशन गडचिरोली समुपदेशक अमोल किरामिजावर,नैसर्गिक शेती चे प्रणेते अरुण नरूले, नागभीड मनसे शहर अध्यक्ष सुधीर राजगडकर, सल्लागार फायन्स ब्रम्हपुरी राजु शामकुळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

स्वागत आणि औपचारिक भाषणांनंतर प्रदिर्घ वर्षानी विखुरलेल्या मित्रांनी एकत्र येत गप्पा, गंमती – जमती केल्या. सर्वानी आपली कौटुंबिक व सामाजिक भुमिका मांडली. या स्नेहमिलन सोहळ्यात इतर जिल्ह्यातून बरेच मित्र आले होते. बर्‍याच वर्षांनंतर एकत्र भेटल्यामुळे सर्वानी आपआपल्या वतीने सखोल परिचय दिला.अविस्मरणीय ठरलेल्या या कार्यक्रमात सर्वानी अनुभवलेल्या जुन्या आठवणीला उजाळा देत खेळीमेळीच्या वातावरणात स्नेहमिलन सोहळ्याचा आनंद लुटला. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी दिनकर संदोकर आणि मित्र मंडळ यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर बनसोड यांनी केले तर आभार प्रदर्शन बाबा लिंगायत यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here