Home वरोरा

आनंदाची बातमी :- वैद्यकीय कोट्यात ओबिसी आरक्षणाला  केंद्र सरकार व सर्वोच्च न्यायालयाकडून मंजुरी,

 

27% OBC आरक्षणाचा मार्ग मोकळा.10% आर्थिक दुर्बल घटकांसाठी सुद्धा मिळणार आरक्षण. ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडेयाने मानले आभार.

चंद्रपुर प्रतिनिधी :-

ऑल इंडिया मेडीकल कोट्यात ओबीसींना २७% आरक्षण व ईडब्लुएस ला १०% आरक्षण देण्याचा निर्णय दि.२९ जुलैला केंद्र सरकारने लागु केला होता. वैद्यकीय कोट्यात ओबिसी आरक्षणाला मा. सर्वोच्च न्यायालयाद्वारे या निर्णयाला मंजुरी मिळाली आहे. याबाबत केंद्र सरकार व मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे ओबिसी नेते डॉ. अशोक जिवतोडे यांनी स्वागत केले आहे.विविध ओबिसी चळवळी व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे हे मोठे यश असल्याचे ओबीसी नेते डॉ. अशोक जिवतोडे यांनी आज येथे सांगितले.

या संदर्भात केंद्राने जुलै-२०२१ मधे निर्णय घेतला होता. मात्र आज (दि.७) ला मा. सर्वोच्च न्यायालयानेही या निर्णयास मंजुरी दिली आहे. याचा लाभ राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांना मेडीकलमधे प्रवेश मिळण्यासाठी होणार आहे. राज्यातील मेडीकल प्रवेशित ओबीसी विद्यार्थ्यांना युजी मधे १५% कोट्यात व पीजीमधे ५०% कोट्यात २७% आरक्षण सत्र २०२१-२२ पासून मिळणार आहे.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे, सचिन राजुरकर यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here