आत्महत्त्यामागचे कारण गूलतस्त्यात कौटुंबिक कलहातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज.
चंद्रपूर :
कौटुंबिक कलहातून घर संसारात आत्महत्त्या करण्याचे प्रकार फार वाढले असून चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात मालडोंगरी येथे एका 33 वर्षीय आईने आपल्या दोन सहा आणि तीन वर्षाच्या मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक व तेवढीच दुर्दैवी घटना आज रविवारी (9 जानेवारी 2022) ला दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे. पती पत्नीच्या कौटुंबिक कलहातून आईने मुलांसह आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. दीपा रवि पारधी (वय 33 ), आयुष (वय 6), पियुष (वय 3 ) असे मृतांची नावे आहेत
मिळालेल्या माहितीनुसार ब्रह्मपुरी शहरापासून चार किलोमीटर अंतरावर मालडोंगरी नावाचे गाव आहे. रवी पारधी हे तेथील रहिवासी आहेत. त्यांच्या कुटुंबात पत्नी दीपा पारधी (33), मुलगा आयुष (6), दुसरा मुलगा पियुष (3) तसेच आई यांचा समावेश आहे. मागील दोन दिवसांपासून रवी पारधी यांच्या कुटुंबात पती पत्नीमध्ये कौटुंबिक वाद सुरू असल्याचे समजते. या वादातूनच पत्नी दीपा हीने दोन्ही मुलांसह आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असावा असाही संशय आहे. काल शनिवारी दुपारी बारा वाजता पत्नी आपल्या दोन्ही मुलांसह घरून निघून गेली होती. सायंकाळी ती परत न आल्याने घरच्या कुटुंबीयांनी तिची शोधाशोध केली, परंतु ठावठिकाणा लागला नाही
काल रविवारी पुन्हा शोधाशोध केल्यानंतर ब्रह्मपुरी मालडोंगरी मार्गावरील गावापासून दोन किलोमीटर अंतरावरील एका शेतातील विहिरीत चपला आणि थैला तरंगताना आढळून आला. त्यामुळे काही नागरिकांनी रवि पारधी यांना माहिती दिली. पत्नी हि गृहिणी होती. तर मोठा मुलगा हा दुसऱ्या वर्गात व लहान मुलगा अंगणवाडीमध्ये होता. पती हे शेतीचे काम करतो. सदर घटनेची माहिती ब्रह्मपुरी पोलिसांना दिल्यानंतर ठाणेदार यादव यांच्या मार्गदर्शनात पोलिसांची चमु घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर विहिरीतून आई आणि दोन मुलांची मृतदेह बाहेर काढण्यात आले. तिघांचेही मृतदेह ब्रह्मपुरी रुग्णालयात शवविच्छेदनाचा करिता पाठवण्यात आलेत. आई आणि दोन मुलांची मृत्यूच्या दुर्दैवी घटनेने मालडोंगरी गावामध्ये शोककळा पसरली आहे. पती रवी पारधी यांच्या घरी कौटुंबिक कारणावरून मागील दोन दिवसांपासून कलह सुरू होता. या कलहातून पत्नीने मुलांसह जीवन यात्रा संपविण्याचा निर्णय घेतल्याचा संशय पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे येत आहे.