Home भद्रावती लक्षवेधक :- अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या कार्यक्रमातून निदादला लोकशाहीचा आवाज.

लक्षवेधक :- अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या कार्यक्रमातून निदादला लोकशाहीचा आवाज.

खऱ्या लोकशाही मधील लोकाभिमुख चौथ्या आधार स्तंभाची भूमिका महत्वाची.

भद्रावती प्रतिनिधी :-

खऱ्या अर्थाने खेड्यांचा विकास झाला तर भारत स्वयंपूर्ण बनेल, स्वावलंबी बनेल असे स्वप्न महात्मा गांधींनी बघितले होते. हीच विचारधारा जोपासत अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शेतकऱ्यांची मुले- ग्रामीण क्षेत्रातील सावित्रीच्या लेकी ,सामा’न्य व्यक्तीमत्वाचा व कृषी, कला ,पत्रकार सामान्य माणसं यांचा मेळ साधून भद्रावती तालुक्यातील चीरादेबी येथील माळरानावर आयोजित ग्रामीण जनसंवाद कार्यक्रमात गौरव करण्यात आला.

लोकशाहीचे आधारस्तंभ पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर, महिलांना शिक्षणाची दारे खुली करून देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचा श्रद्धांजलीपर कार्यक्रम अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ पूर्व विदर्भ प्रदेश अध्यक्ष रवींद्र तिराणिक यांच्या मार्गदर्शनात जिल्हा चंद्रपूर द्वारा ग्रामीण जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन चिरादेवी येथील शेतमाळरानावर करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून प्रदीप नागपुरकर ,भारतीय युवा संस्कार परिषद संस्थापक , पत्रकार संघाचे पूर्व विदर्भ उपाध्यक्ष यांच्या हस्ते झाले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामआखरे सामाजिक कार्यकर्ते जनमंच ,भारतीय सेवा मंडळाचे संस्थापक तथा पत्रकार संघाच्या सामाजिक मंचाचे पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते .कार्यक्रमाला प्रमुख अतिथी सांस्कृतिक कला विभागाचे मुख्य मार्गदर्शक प्रा.पंकज ईटकेलवार दै.विदर्भ मतदार वर्धा आवृत्तीचे संपादक प्रा.राजभाऊ गोरडे ,भारतीय सेवा मंडळाचे संचालक नरेंद्र बोड , राशिद शेख ,चिरा देवी येथील प्रथम नागरिक सरपंच निरुपा ला मेश्राम ,सामाजिक मंच महिला जिल्हा संपर्कप्रमुख अलकाताई पचारे ,जिल्हा संघटिका रजनी मेश्राम, संपूर्ण महाराष्ट्र पर्यावरणाचा संदेश देत भ्रमण करून आलेली सायकल यात्री प्रणाली चिकटे ,पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप कोहपरे ,संघटक सुरेश बांगडकर ,चंद्रपूर-गडचिरोली संपर्कप्रमुख गोपी मित्रा ,जिल्हा चिटणीस मिलिंद वाकडे सामाजिक मंच जिल्हा उपाध्यक्ष माधव जीवतोडे प्रामुख्याने जनसंवाद या व्यासपीठावर उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला अनाथांची माय -आई सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.प्रास्ताविक भाषणातून रवींद्र तिराणिक यांनी जनसंवाद कार्यक्रमाची भूमिका विशद केली . तत्पूर्वी डॉ.उषाताई साजापूरकर पूर्व हिंदी विभागाअध्यक्ष ,नागपूर विद्यापीठ “चेतना चक्रावत “पुस्तक प्रकाशन उपस्थित मान्यवर च्या हस्ते झाले. राम आखरे यांच्या प्रखर लिखित पुस्तकाचे विमोचन करण्यात आले .प्रसंगी गुणवत्ता श्रेणीत प्रथम येत नवोदय विद्यालयात निवड झालेल्या ग्रामीण विभागातील शेतकऱ्यांच्या मुला मुलींचा गुणगौरव व सावित्रीच्या लेकी चा सत्कार .जनसामान्यात आपले व्यक्तिमत्त्व फुलवणाऱ्या सामान्य माणसाचा सत्कारही याप्रसंगी करण्यात आला. पर्यावरण जनजागृतीसाठी सायकल ने संपूर्ण महाराष्ट्र भर पर्यावरण संवर्धनासाठी सायकलवर प्रवास पूर्ण करून जनसंवाद कार्यक्रमात दाखल झालेल्या सायकल यात्री कुमारी प्रणाली चिकटे हिचा सन्मानपत्र – पुस्तिका- विशेष पुस्तके, अनलॉक अंक व रोपटे देऊन कार्याचा गौरव करीत सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी सत्काराला उत्तर देतांना प्रणाली म्हणाली कुठल्याही एका विचारधारेचा झेंडा नाही सर्वांना एकत्र करणाऱ्या विचारांचा झेंडा राष्ट्रध्वज सोबत घेऊन मी पुढे निघाले आहे. यातच पर्यावरणाचा संदेश आहे . याप्रसंगी ग्रामीण भागातील शेतकरी पालक व मुलींचा गुणगौरव करण्यात आला. प्रज्वलि ताजणे, .यामिनी ताजणे आकांक्षा सातपुते, हिमांशू मंगाम, आरोषी चटकि यांचा वृक्ष-रोप सन्मानपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला.

गेली अनेक वर्षापासून कला विभाग व ग्राफिक्स डिझाईन कलावंत म्हणून कार्यरत .कला क्षेत्रात उच्च विद्याविभूषित असलेले मिलिंद वाकडे, जिल्हा चिटणीस , कला डिझाईन्स विद्यार्थी निकेत माथकर, चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघात संघाचे चे (कार्यवाहक) कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले गणेश पेंदोर, तर सर्पमित्र व पर्यावरण संवर्धनात सक्रिय असलेले श्रीपाद बाकरे यांचा सत्कार करण्यात .सामाजिक ग्रामीण क्षेत्रातील सामान्य व्यक्तिमत्त्व चिंधुजी ताजणे ,जगन्नाथ बाबा मठाचे संस्थापक सेवानिवृत्त उच्च श्रेणी मुख्याध्यापक वासुदेव धानोरकर , कृषीविषयक कार्यात सक्रिय असलेले रवींद्र कोंगरे ,सावित्रीच्या लेकी म्हणून सामाजिक कार्यात नेहमी प्रबोधन करीत असलेल्या ताराबाई चहांदे , चिरा देवी येथील नवनियुक्त महिला सरपंच प्रथम महिला नागरिक निरूपाला मेश्राम यांचाही सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ जनसंवाद कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता दीपक आवटे ,अरुण चिंचपाले ,गणेश पेंदरे, विलास सातपुते, लक्ष्मण वासेकर ,किशोर धानोरकर, वैशाली देवतळे ,अंकिता देवतळे, प्रतिभा सातपुते, अर्चना सातपुते, भाग्यश्रीची तिराणिक,चंद्रकला सातपुते, पूजा सिंग ,मंजुषा सातपुते, लता आत्राम ,पार्वता कोंगरे ,जमुना शेडमाके ,सविता कांबळे, वैशाली देवतळे ,मनीषा सातपुते ,कमलाबाई सातपुते ,जोशना मोरे आदींनी अथक परिश्रम केले.

Previous articleधक्कादायक :- दोन लहान मुलांसह आई ची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या?
Next articleधक्कादायक :- सिटिपिएसचे अधिकारी व कोळसा व्यापारी मिळून कोट्यावधीचा कोळसा घोटाळा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here