Home चंद्रपूर धक्कादायक :- सिटिपिएसचे अधिकारी व कोळसा व्यापारी मिळून कोट्यावधीचा कोळसा घोटाळा.

धक्कादायक :- सिटिपिएसचे अधिकारी व कोळसा व्यापारी मिळून कोट्यावधीचा कोळसा घोटाळा.

विमला सायडिंग वरून राख व रिजेक्ट कोळशाची भेसळ करून सिटिपिएस ला निकृष्ट दर्जाचा कोळसा पुरवठा.

चंद्रपूर प्रतिनिधी:-

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी परिसरात असलेली विमला रेल्वे सायडिंग म्हणजे कोळशाची हेराफेरी करणारे मुख्य ठिकाण बनले असून सिटिपिएस मधे रेल्वेने जाणाऱ्या कोळशामधे मोठ्या प्रमाणात काळे गोटे,कोल वॉशरिज चा रिजेक्टेड कोळसा व पॉवर प्लांट ची राख मिसळून दिल्या जाते तर या रेल्वे सायडिंग वर वेकोली कडून आलेल्या चांगल्या कोळशाची काही कोळसा व्यापारी कडून उचल करून तो चांगल्या दर्जाचा कोळसा खुल्या मार्केट मधे चढ्या भावाने विकल्या जात आहे. यामधे सिटिपिएस अधिकारी व कोळसा व्यापारी यांचे संगनमत असून कोट्यावधी रुपयाचा कोळसा घोटाळा होतं असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे.

महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात मोठे वीज निर्मिती केंद्र असलेला सिटिपिएस मधे वर्षाकाठी तेथील वीज निर्मिती यूनिट च्या मेन्टेनन्सच्या नावाखाली कोट्यावधी रुपयाची उधळपट्टी होतं आहे, याचे महत्वाचे कारण म्हणजे या ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या कोळशात मोठ्या प्रमाणात दगडी रिजेक्टेड कोळसा व राख ही आहे. एकीकडे वीज निर्मिती करताना उत्पादन किंमत वाढल्याने विजेचे दर सुद्धा वाढवले जात आहे, त्यामुळे सर्वसामान्य जनतेला विजेचे मोठ्या प्रमाणात वाढलेले वीज बिल भरण्यास मोठी अडचण येत आहे, मात्र यामधे मोठ्या प्रमाणात सिटिपिएस प्रशासनाकडून करण्यात येत असलेला भ्रष्टाचार हा प्रमुख मुद्दा असून चंद्रपूर परिसरातील जे ऊद्दोग आहे त्याच्या वेस्टेज चा विमला सायडिंग मधे माल मिसळून तो कोळसा सिटिपिएस ला रेल्वे द्वारा पाठवल्या जात असून यामधे महिन्याकाठी करोडो चा भ्रष्टाचार होतं असल्याची बाब समोर येत आहे.

विमला सायडिंग बंद करण्याची प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस?

कोळशा मधे मोठ्या प्रमाणात वेस्टेज व रिजेक्टेड कोळसा व इतर कचरा मिसळून दर महिन्याला कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार होतं असलेल्या विमला रेल्वे सायडिंग वर मोठ्या प्रमाणात प्रदूषण सुरू असून आजूबाजूसअसलेल्या शेतकऱ्यांच्या शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे तर या मार्गाने जाणाऱ्या दोन चाकी व चार चाकी वाहनाला येथील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे व मोठ्या प्रमाणांत होतं असलेल्या वायू प्रदूषणाने जाणे मुश्किल झाले आहे. अशातच आता या विमला सायडिंग च्या प्रदूषणाची दखल प्रदूषण नियंत्रण बोर्डाने घेतली असून ही विमला सायडिंग बंद का करण्यात येऊ नये अशी नोटीस जारी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here