Home चंद्रपूर खळबळजनक :- चंद्रपूर मनपा मधे अग्निशमन विभागात तब्बल पाच वेळा टेंडर?

खळबळजनक :- चंद्रपूर मनपा मधे अग्निशमन विभागात तब्बल पाच वेळा टेंडर?

आपल्या मर्जीतल्या व्यक्तीला टेंडर देण्यासाठी मनपा सत्ताधारी यांच्या वर्षभर कोलांटउड्या?

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर महानगरपालिकेत सद्ध्या एका टेंडरची ऐतिहासिक वाटचाल सुरू असून आपल्या मर्जीच्या व्यक्तीला टेंडर मिळावे म्हणून तब्बल पाच वेळा टेंडर काढण्याची नामुष्की मनपा प्रशासनावर आल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. मनपा मधे अग्निशमन दलाची कमान ही स्थानिक एका कंत्राटदाराकडे होती व त्यांच्या कार्यकाळात मनपा च्या अग्निशमन दलाने शहरात झालेल्या अनेक आगीच्या घटनेत मोलाची कामगिरी बजावली होती.

दरम्यान 11 महिन्याच्या प्रायोगिक तत्वावर दिलेल्या या टेंडर ची सुरुवात व्हायला म्हणजे वर्कऑर्डर कंत्राटदाराच्या हातात द्यायला मनपा प्रशासनाला तब्बल वर्ष लागले व 2019 मधे हे अग्निशमन दलाचे टेंडर प्रत्यक्षात मार्गी लागले. पण त्यानंतर सन 2020 ला पुन्हा टेंडर करायचे होते म्हणून मनपा प्रशासनाने 21/10/2020 ला टेंडर काढले पण त्यामधे कंत्राट घेणाऱ्या स्पर्धक पार्ट्या टेंडर मधे सामील झाल्या नसल्याने ते टेंडर रद्द करून पुन्हा नव्याने 17/12/2020 ला टेंडर काढण्यात आले. नंतर ते सुद्धा फिस्कटले नंतर 23/4/2021 ला काढण्यात आले ते सुद्धा फसले आणि 17/9/2021 ला चौथ्यांदा टेंडर काढल्यानंतर पुन्हा आता पाचव्यांदा म्हणजे 17/1/2022 ला पुनः टेंडर ओपन करण्यात येणार आहे. म्हणजे तब्बल पाच वेळा टेंडर काढल्यानंतर एकही कंत्राटदार सत्ताधारी यांना आवडला नाही किंव्हा कसे ? हा गंभीर प्रश्न असून महानगरपालिकेच्या पैशाची उधळपट्टी मनपा प्रशासनाकडून होतं असल्याने जनतेतून रोष असून आपल्या मर्जीतल्या कंत्राटदाराला हे टेंडर मिळावे म्हणून हा खटाटोप तर नाही ?असा प्रश्न उपस्थित होतं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here