चक्क पुजारी धर्मपाल प्रजापतीनेच विकले मंदिर, मंदिर तोडणाऱ्या गौरव मंडलला भक्तांचा चोप?
चंद्रपूर प्रतिनिधी :-
मागील 38 वर्षापासून उभे असलेले सत्यम शिवम सुंदरम नावाचे माता महाकाली मंदिर चक्क तिथे पुजारी असलेल्या धर्मपाल प्रजापती नावाच्या व्यक्तीने गौरव मंडल नावाच्या व्यक्तीला विकले असता त्यांनी ते मंदिरच तोंडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून त्या परिसरातील भक्तांनी मंदिर तोडणाऱ्या गौरव मंडल ला चांगलाच चोप दिल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जवळपास 38 वर्षापूर्वी बल्लारपूर रोडकडे जाणाऱ्या रैतवारी परिसरात 7 फरवरी 1983 ला शिव मंदिर उभारण्यात आले होते व त्याच्याच जवळ माता महाकाली मंदिर सुद्धा बनविण्यात आले होते. त्या मंदिरात धर्मपाल प्रजापती व उदयभान प्रजापती हे दोन भाऊ पूजा अर्चा करायचे त्यामुळे त्या जमिनीच्या मूळ मालक असलेल्या शास्त्रकार यांनी त्या मंदिराची जागा दान दिली होती. दरम्यान गौरव मंडल यांनी त्या मंदिराच्या मागील जागेत आपले बस्तान बसवले असल्याने व मंदिर समोर असल्याने त्यांच्या जागेत जाण्याची अडचण येत असल्याने त्यांनी प्रजापती यांना पटवले व काही पैसे देऊन त्या मंदिरा सह ती जागा विकत घेतली आणि रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत ते मंदिर तोडले. ही वार्ता दुसऱ्या दिवशी या परिसरातील भक्तांना माहीत होताच त्यांनी मंदिर तोडणाऱ्या गौरव प्रजापती यांना चांगलाच चोप दिला दरम्यान ही बाब रामनगरच्या पोलीस स्टेशन मधे गेली व तिथे पुन्हा मंदिर बनवून देण्याच्या अटीवर समझोता झाला.
मंदिर तिथेच बांधण्याचा करार झाला असला तरी मंदिर विकणाऱ्या प्रजापती बंधुवर व मंदिर तोडणाऱ्या गौरव मंडल यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे केली असल्याने या प्रकरणात नेमके काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.