Home चंद्रपूर चिंताजनक ;- मरणाच्या दारात उभी असलेल्या दलविंदर कौर यांना चक्क पोलिसांकडूनच ठेंगा?

चिंताजनक ;- मरणाच्या दारात उभी असलेल्या दलविंदर कौर यांना चक्क पोलिसांकडूनच ठेंगा?

जादूटोणा प्रतिबंधक अंतर्गत पोलीस का करत नाही कारवाई? मुलगी मांडणार पोलीस महानिरीक्षक व गॄहमंत्री यांच्याकडे कैफियत?

चंद्रपूर प्रतिनिधी :

दलविंदर कौर या 26 वर्षीय मुलीची कहाणी अत्यंत दुःखद व तितकीच भयावह आहे. तिच्या सख्ख्या भावाने वडिलांचा खून केला व त्याला आजीवन कारावास झाला दरम्यान आई पण एक वर्षापूर्वी मरण पावली. भाऊ जेलमधून तात्पुरत्या कंडीशन बेल वर बाहेर आहे. त्याला रामनगर पोलिस स्टेशन च्या हद्दीत येण्यास मनाई हुकूम न्यायालयाने दिला आहे. मात्र त्याची पत्नी किरायादार महिलेच्या सोबत मिळून घरावर ताबा करण्यासाठी दलविंदर कौर या अविवाहित मुलीला जीवे मारण्यासाठी जादूटोणाचा वापर करत घरात निंबु व पूजा साहित्य टाकत आहे. व अश्लील भाषेत शिवीगाळ व जीवे मारण्याचा प्रयत्न करीत आहे याबद्दल रामनगर पोलीस स्टेशन मधे तक्रार दिल्यानंतर पोलीस जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करण्यापेक्षा केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून त्या मुलीला न्यायालयात दाद मागण्याची पर्यायाने मरणाच्या दारात ढकलत आहे. त्यानंतर ती मुलगी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे न्याय मागण्यास जाते तर तिथे सुद्धा तिलाच कडक शब्दात इशारा दिला जातो म्हणजे पोलीस रक्षक आहे की भक्षक? हेच कळायला मार्ग नसून उद्या कारागृहातून बाहेर असलेल्या त्या मुलीच्या भावाने प्रॉपर्टी साठी तिचा खून केला तर खरंच पोलीस प्रशासन जबाबदारी घेणार आहे का? असा गंभीर प्रश्न निर्माण होतं आहे.

सविस्तर माहिती अशी आहे की दलविंदर कौर सेवासिंग पटवालिया ही त्यांचे वडील सेवासिंग पटवालिया यांच्यासह आई सोबत सरकार नगर येथील घरी राहायचे. दरम्यान राहायचे दरम्यान तिचा भाऊ दलजितसिंग पटवालिया यांनी आंतरजातीय विवाह केल्याने तो काही दिवस बाहेर होता. त्यानंतर तो घरी आल्याने आईच्या नावाने असलेल्या घराच्या वरच्या मजल्यावर त्याला स्वतंत्र रहायला वडिलांनी संमती दिली होती,या वेळी सन 2016 ला तिच्या भावाने वडिलांची हत्या केली त्यामुळे त्याला आजीवन कारावास झाला असून जवळपास 4 वर्षाची सजा काटुन आल्यानंतर रामनगर पोलीस स्टेशन च्या हद्दीत येण्यास मनाई हुकूम च्या कंडीशन वर तो तात्पुरत्या बेल वर बाहेर आहे.

मुलाला आपल्या प्रॉपर्टी वरून बेदखल करून आईने आपली मुलगी दलविंदर कौर हिच्या नावाने स्त्रीधन हक्क कायद्यांतर्गत घराचा ताबा व मृत्युपत्र लिहून दिल्याने घरावर मुलीचा कब्जा आहे व महानगरपालिका चंद्रपूर येथे कर पावती पण तिच्याच नावाने आहे. मात्र त्या घरावर कब्जा करण्यासाठी तिच्या वहिनीने घराचे वरील मजल्यावर असलेल्या घराला कुलूप लावले व अख्खे घरच कब्जात घेण्यासाठी तिने दलविंदर कौर हिला जीवे मारण्यासाठी मांत्रिकाकडून जादूटोणा करण्याचा गंभीर प्रकार चालवला आहे. सोबतच जेल मधून बाहेर असलेल्या भावाने आपल्या बहिणीला पण ठार मारण्याचा प्रयत्न चालवला असल्याने पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेण्याऐवजी उलट तिलाच जणू आरोपी बनविण्याचा प्रयत्न चालविला असल्याचे चित्र दिसत आहे.

स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांकडून न्याय मिळत नसल्याने मुलगी जाणार पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे.

स्त्रीधन कायद्यानुसार आई कडून मिळालेल्या संपतीवर मुलीचाच अधिकार असल्याने व तिच्या आईने तिच्या नांवावर सन 2015 कब्जा पावती दिली व सन 2019 ला तिच्या नावाने वारसान हक्क (मृत्युपत्र) लिहून दिले त्यामुळे स्त्रीधन हक्कानुसार ती खरी वारसदार झाली आहे. दरम्यान स्वतःची संपती वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना तिच्या जीवाला भावा सह वहिनी व किरयादार महिला वंदना वानखेडे यांच्यापासून मोठा धोका आहेवाजता तिला तिला जीवे मारण्याचा प्रयत्न पण झाला आहे. परंतु पोलीस प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने आता दलविंदर कौर ही मुलगी पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे व गॄहमंत्री यांच्याकडे स्थानिक पोलीस प्रशासनाने कसे तिला मरणाच्या दारात ढकलले याबद्दल कैफियत मांडणार असल्याची माहिती आहे. दरम्यान आता तरी पोलीस प्रशासनाचे डोळे उघडतिल का ? हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here