Home चंद्रपूर क्राईम :- मरणाच्या भीतीने दलविंदर कौर फिरताहेत दारोदार, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह?

क्राईम :- मरणाच्या भीतीने दलविंदर कौर फिरताहेत दारोदार, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह?

जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे मुलीची  न्यायाची  मागणी.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

वेळोवेळी ” सदरक्षनाय खलनीग्रहनाय ” या ब्रीदा ला हड़ताळ फासून उलट काम करणाऱ्या पोलिसांची अनेकवेळा गच्छंती झाली आहे मात्र तरीही पोलिसांच्या कर्तव्यावर अजूनही प्रश्नचिन्ह निर्माण  होतच आहे असाच एक किस्सा रामनगरच्या पोलीस स्टेशन मधे घडत असून त्याला एक मुलगी बळी पडत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे आपला जीव वाचविण्यासाठी ती मुलगी दारोदार फिरत असल्याने तिचा जीव गेल्यानंतरच पोलीस प्रशासन जागणार आहे का? हा गंभीर प्रश्न उपस्थित होतं आहे

चंद्रपूर शहरातील सरकार नगर मधे राहणाऱ्या 26 वर्षीय दलविंदर कौर या मुलीला प्रॉपर्टी च्या वादातून जादूटोणा करून ठार करण्याचा मनसुबा ठेऊन तिच्या खोलीत निंबु व हळद कुंकू टाकणाऱ्या निखिल पटवालिया या वहिनी व वंदना वानखेडे महिलांवर जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत रामनगर पोलिसांनी कारवाई न करता उलट तिच्यावरच दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे त्या मुलीने तक्रार केली आहे. या संदर्भात वडेट्टीवार यांचे स्वीय सहायक प्रवीण देशमुख यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना कारवाई चे आदेश दिले असल्याची माहिती आहे. दरम्यान दोन दिवस लोटून गेल्यानंतर सुद्धा रामनगर पोलीस स्टेशन मधून कारवाई संदर्भात कुठल्याही हालचाली दिसत नसल्याने त्या मुलीचा जीव गेल्यानंतरच पोलीस संबंधितांवर गुन्हा दाखल करणार का? असा प्रश्न निर्माण होतं आहे.

दलविंदर कौर यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की माझे वडील सेवासिंग पटवालिया यांच्यासह मी व आई राहायचे, माझा मोठा भाऊ दलजितसिंग पटवालिया यांनी आंतरजातीय विवाह केल्याने तो काही दिवस बाहेर होता. त्यानंतर तो घरी आल्याने माझ्या आईच्या नावाने असलेल्या घराच्या वरच्या मजल्यावर त्याला स्वतंत्र रहायला माझ्या वडिलांनी संमती दिली होती, या दरम्यान माझ्या भावाने सन 2016 ला माझ्या वडिलांची हत्या केली त्याला आजीवन कारावास झाला असून जवळपास 4 वर्षाची सजा काटुन तो जामिनावर बाहेर आहे व तो रामनगर पोलीस स्टेशन च्या हद्दीत येणार नाही असा आदेश न्यायालयाने दिला आहे. दरम्यान सन 2020 ला माझी आई सुद्धा मरण पावली.त्यानंतर मी एकटी असल्याचा फायदा घेऊन माझ्या भावा सोबत घरातून निघून गेलेली गैरअर्जदार क्रमांक 1 माझी वहिनी हिने माझ्या घराचे वरील मजल्यावर असलेल्या घराला कुलूप लावले. सदर जागा ही माझ्या आईने माझ्या नांवावर सन 2015 कब्जा पावतीद्वारे दिली व सन 2019 ला माझ्या नावाने वारसान हक्क (मृत्युपत्र) लिहून दिला होता. त्यानंतर मी स्त्रीधन हक्क कायद्यानुसार खरी वारसदार झाल्याने माझा जेलमधून सुटून आलेल्या भावाने पत्नीचा सहारा घेऊन व बाजूला असलेल्या गैर अर्जदार वंदना वानखेडे हिचे माध्यमातून मला धमकावून व वेळोवेळी माझ्यावर हल्ला केला व मला माझ्या घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न चालवलेला आहे.

तिने तक्रारीत पुढे म्हटले आहे की माझ्यावर झालेल्या हल्ल्या विरोधात मी रामनगर पोलीस स्टेशन मधे अनेक वेळा तक्रारी केल्या, दरम्यान दिनांक 21 जानेवारीला मी घरात एकटी असल्याचा फायदा उचलून मांत्रिकाचा सहारा घेऊन माझ्या घरात निंबु व इतर पूजेचे साहित्य टाकण्यात आले व मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर माझ्यावरच झालेल्या जादूटोणा हल्ला याची परिस्थिती दाखविण्यासाठी दिनांक 25 जानेवारीला बोलावलेल्या पत्रकार राजू कुकडे यांना माझ्या भावाने माझ्या वहिणीच्या मोबाईल क्रमांक 9359361032 फोन करून “तुम्ह वहाँसे नीकलो मेरे बहन को मारनेकी फिल्डिंग लगी है ” असे म्हटले त्यावरून मी पोलीस हवालदार मोहूरकर यांना फोन केला व पोलीस स्टेशन मधे गेली पण अगोदरच मी दिनांक 21 जानेवारीला दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी गैरअर्जदार यांच्यावर गुन्हे दाखल केले नाही शिवाय माझे किरायादार यांना सुद्धा माझ्या भावाने फोनवर धमकी देऊन घरातून निघून जाण्याची तंबी दिली असल्याने रामनगर पोलीस स्टेशन मधे या विरोधात तक्रार दिली मात्र त्यानंतर सुद्धा पोलिसांनी कारवाई केली नाही व त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली नाही त्यामुळे माझ्या भावा पासून व गैर अर्जदार वहिनी सह बाजूने असलेल्या किरायादार महिलाकडून माझ्या जीवीताला धोका असल्याने गैर अर्जदार यांच्यासह माझ्या भावावर जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे.

Previous articleराजकीय :- भाजप-मनसे युती बाबत अजूनही निर्णय नाही, मनसे स्वबळावर लढणार .
Next articleपंचनामा :- वरोरा तालुक्यातील चिकणी गावाशेजारी अवैध दारू व जुगार अड्डा ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here