लाखोंच्या जुगारात बाहेरील गावातील माणसे लुबडतात शेतकऱ्यांना.पोलीस प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष की खुली सूट?
वरोरा प्रतिनिधी :-
वरोरा तालुक्यातील अनेक गावांत बेकायदेशीर अवैध दारू विक्री, सट्टा पट्टी व जुगारचा गोरखधंदा सुरू असून पोलिसांचा या अवैध धंद्याना एक प्रकारे अभय मिळाला असल्याचे बोलल्या जात आहे. जिल्ह्यात दारूबंदी असतांना सगळीकडे अवैध दारू विक्री व्हायची पण आता दारूबंदी उठल्यानंतर सहज दारू उपलब्ध होतं असताना सुद्धा गाव तिथे दारू हा फोर्मूला वापरून काही दारू माफिया आज पण अवैध दारू विक्री करीत असल्याचे चित्र दिसत आहे. अशातच चिकणी या गावा शेजारी जुगार व अवैध दारू विक्रीचा अड्डा सुरू असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे.
वरोरा शहरापासुन काही अंतरावर असलेल्या चिकनी गावात अनधीकृत दारु, सट्टा,आणि जुगार याला सुगीचे दिवस आले असून गावा शेजारी अवैध दारू विक्रीसह जुगार अड्ड्यावर जुगार खेळण्यास बाहेर गावातील लोक येत आहेत. या परिसरातील शेतकरी आपले धान्य विकल्यानंतर या जुगार अड्ड्यावर येऊन लाखो रुपये हरतो अशी माहिती असून पोलीस प्रशासनाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होतं असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहे. या अवैध धंद्याना चालना देणारे नेमके कोण आहेत? याचा शोध पोलिसांनी घेऊन या अवैध धंद्याना वेळीच लगाम लावण्यात यावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून होतं आहे.