Home भद्रावती खळबळजनक :- कर्नाटका एम्टा कोळसा खानीतून पुन्हा कोळसा चोरी?

खळबळजनक :- कर्नाटका एम्टा कोळसा खानीतून पुन्हा कोळसा चोरी?

खणिकर्म अधिकारी यांनी पकडकेले कोळशाचे ट्रक चोरीचे की की कसे? प्रशासनाची चुप्पी?

भद्रावती प्रतिनिधी :-

तालुक्यातील बरांज परिसरातील कर्नाटका एम्टा कोळसा खानितून तब्बल 3 लाख टन कोळसा चोरी झाल्याची बाब जिल्ह्यात खळबळ उडवून देणारी ठरली असली तरी त्यानंतर मात्र जिल्हा प्रशासनाकडून चौकशीत काहीही निष्पन्न झाले नसल्याचे समोर आले होते, दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी या कोळसा चोरी प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, आता तीन वर्षानंतर पुन्हा एकदा कर्नाटका एम्टा कंपनीतून कोळसा चोरी होतं असल्याच्या चर्चा रंगत होत्या पण आता चक्क कोळशाच्या गाड्या खणिकर्म विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडल्याने कोळसा चोरीचे बिंग फुटले असल्याचे चित्र आहे.

सन 2009-12 च्या काळात कर्नाटक एम्टा कोलमाइन्स कम्पनीतून निघालेला कोळसा गुप्ता कोल वॉशरिज लि.मार्फत वॉश करण्यासाठी देउरवाड़ा, माजरी, घुग्घुस जात होता पण 100 टक्के कोळसा पाठविल्या नंतर 80 टक्के कोळसा हा उच्च दर्जाचा कोळसा कर्नाटक पॉवर कारपोरेशन लि. पाठविण्याचा करार होता पण प्रत्यक्षात केवळ 40 टक्के च कोळसा हा पाठविला जायचा शिवाय तो सुद्धा निकृष्ट दर्जाचा असायचा त्यामुळे तेंव्हा सीबीआय च्या धाडी पडल्या होत्या व त्यात 2009-12 च्या एम्टा प्रशासन व गुप्ता कोल प्रशासन चे डायरेक्टर पियूष मेरोडिया, ट्रॉस्पोर्टिंग इंचार्ज अमित सिंह व कापसे, पवन दुबे, धर्मेन्द्र सिंह व एम्टा के ए.के. गौर, ए.के. लोखंडे, साइडिंग इंचार्ज अशोक महंत, वे-ब्रिज इंचार्ज हरिगोविंद कुशवाहा इत्यादीवर कारवाई होण्याची शक्यता होती पण ते प्रकरण त्यावेळी थंड पडले व पुन्हा कोळसा चोरी मोठ्या प्रमाणांत सुरू झाली व नंतर च्या काळात तब्बल 3 लाख टन कोळसा चोरी कंपनीच्या सायडिंग वरून झाली हे तथ्य समोर आले.

कोळसा चोरीचे ट्रक पकडल्याने नेमके काय होणार?

दोन दिवसापूर्वी कोळशाचे पकडलेले ट्रक हे खरंच कोळसा चोरीचे होते का? हा पहिला प्रश्न असून आता वरून दबाव आल्यानंतर खणिकर्म अधिकारी याला दुसरे स्वरूप देऊ शकतात व सांगू शकतात की ट्रक वरती त्रीपाल नव्हती किंव्हा या ट्रक चालकाजवळ डिओ ची स्लिप नव्हती व नंतर ती देण्यात आली. कारण एणकेण प्रकारे या प्रकरणात पैशाची उलाढाल होऊन हे प्रकरण थंड बस्त्यात टाकायच्या हालचाली होतं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here