Home वरोरा श्री सिद्धिविनायक सहकारी पत संस्थेच्या संचालक व प्रशासकाविरोधात पोलीस महासंचालकाकडे तक्रार.

श्री सिद्धिविनायक सहकारी पत संस्थेच्या संचालक व प्रशासकाविरोधात पोलीस महासंचालकाकडे तक्रार.

गुंतवणूकदार सरक्षण अधिनियम कायद्यांतर्गत संचालक व प्रशासकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी.

वरोरा प्रतिनिधी :

वरोरा शहर व तालुक्यातील हजारो गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यास टाळाटाळ करणाऱ्या श्री सिद्धिविनायक सहकारी पत संस्थेच्या संचालक मंडळावर गुंतवणूकदार सरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करून ग्राहकांचे पैसे परत करण्याची मागणी जन आक्रोश सामाजिक संघटनेचे अध्यक्ष अमोल बावणे यांनी पोलीस महासंचालक यांच्यासह सहकार व पणन मंत्रालय मुख्य सचिव यांच्याकडे केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.

वरोरा शहरात असलेल्या श्री सिद्धिविनायक सहकारी पत संस्थेच्या संचालकांनी नियमबाह्य कारभार करून लाखो रुपयाची उधळण केली असल्याने ठेवीदारांचे पैसे मुदतीत न देता सहायक निबंधक व लेखापरीक्षण अधिकाऱ्यांना मैनेज करून लाखों रुपयाचा घोळ केल्याचे चौकशीत समोर आले. दरम्यान जिल्हा उपनिबंधक यांनी श्री सिद्धिविनायक सहकारी पत संस्थेच्या संचालकांना बरखास्त करून संस्थेचा कारभार हा प्रशासक यांच्याकडे दिला होता. खरं तर या प्रशासकांनी ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते परंतु ते न करता उलट संचालकांना वाचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याने अँड अमोल बावणे यांनी मुंबई मंत्रालयातील सहकार व पणन मंत्रालयातील मुख्य सचिव यांच्यासह पोलीस महासंचालकाकडे तक्रार करून संचालकांवर गुंतवणूकदार सरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. जवळपास 70 ते 80 लाख रुपयांच्या ठेवी ठेवीदारांना आजपर्यंत परत केल्या नाही त्यामुळे या गंभीर प्रकरणी जर वरिष्ठांकडून या प्रकरणाची दखल घेतली नाही तर या पतसंस्थेच्या ठेवीदारांना घेऊन जनांदोलन उभारले जाईल असा इशारा अँड अमोल बावणे यांनी प्रशासनाला दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here