Home महाराष्ट्र राज्यात आता ७ हजार पोलीस भरतीची प्रक्रिया लवकरच होणार.

राज्यात आता ७ हजार पोलीस भरतीची प्रक्रिया लवकरच होणार.

काय आहे पोलीस भरतीची प्रक्रिया?जाणून घ्या सविस्तर.

मुंबई न्यूज वार्ता :-

राज्य सरकारच्या गृह विभागातर्फे मागील सन 2019 ला राबविण्यात आलेली भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून आता लवकरच अलीकडेच घोषणा केल्यानुसार सुमारे सात हजार पोलीस कॉन्स्टेबल पदांची भरती सुरु करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले आहे.

त्यांनी गेल्या आठवड्यातच राज्यामध्ये सुमारे सात हजार पोलीस शिपायांची भरती प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार असल्याचे घोषणा करून नौकरीच्या शोधत असणाऱ्या युवकांच्या आशा पल्लवित केल्या आहे. 2019 मधील पोलीस भरतीची प्रक्रिया पूर्ण झाली असून यात निवड झालेल्या 5297 उमेदवारांच्या प्रशिक्षणाला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. जूनी पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानं आता 7231 पदांसाठी पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. यामुळे पोलीस भरतीसाठी तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी दिलासा मिळाला आहे.

आता नव्याने जी पोलीस भरती होणार आहे ती नव्या नियमानुसार करण्यात येणार आहे. सातत्याने समोर येणारे भरती प्रक्रियेतील घोटाळे लक्षात घेता गृहखात्यानं स्वत: पोलीस भरतीची प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे. भरती प्रक्रियेचे अधिकार प्रत्येक जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांना मिळणार
आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here