Home भद्रावती दखलपात्र :- नंदोरी ग्रामपंचायत उपसरपंच यांनी केला पदाचा गैरवापर?

दखलपात्र :- नंदोरी ग्रामपंचायत उपसरपंच यांनी केला पदाचा गैरवापर?

स्वतःच्या घराच्या बांधकामासाठी ग्रामपंचायत स्ट्रीट लाईटचा फोकस ?

भद्रावती प्रतिनिधी :-

गावाच्या राजकारणात सरपंच व उपसरपंच यांची नेहमीच दादागिरी चालत असते कारण त्यांना नेहमी वाटत असते की आपण ग्रामपंचायत चे मालक झालो पण खऱ्या अर्थाने हे फार चुकीचे व घटनाबाह्य असून जर पदाचा गैर वापर झाल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे झाल्यास व त्यात टे दोषी आढळल्यास त्यांचे पद जाऊ शकते, मात्र सत्तेची नशा माणसाला एवढी चढते की बाह्य जग त्यांना अगदी तुच्छ वाटायला लागते असाच एक दुर्दैवी प्रकार भद्रावती तालुक्यातील नंदोरी या गावात घडला असून विद्यमान उपसरपंच तथा माजी तंटामुक्ती अध्यक्ष मंगेश भोयर यांनी आपल्या घराच्या बांधकाम कामासाठी चक्क ग्रामपंचायत च्या स्ट्रीट लाईट चा फोकस आपल्या घरी ठेऊन बाकी गावकऱ्यांना अंधारात ठेवण्याचा प्रकार चालवला असल्याची माहिती असून या प्रकरणी गावकरी संतापले आहे.

नंदोरी ग्रामपंचायत ही बऱ्यापैकी आर्थिक द्रुष्टीने मजबूत असली तरी या गावात रस्त्यांचे स्ट्रीट लाईट हे कमी पावर चे व कमी उजेड देणारे आहे मात्र उपसरप्च मंगेश भोयर यांनी पदाचा दुरुपयोग करून त्यांनी घरासमोरील स्ट्रीट लाईट फोकस चा वापर रात्रीला स्वतःच्या घर बांधकाम यासाठी करीत असल्याने गावात अंधार व उपसरपंच उजेडात हा कसला आहे ?असा सवाल करून एका गावकऱ्यांनी प्रसारमाध्यमांत ही चर्चा पसरवली असल्याने उपसरपंच मंगेश भोयर यांच्या घर बांधकामा वर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here