Home वरोरा संतापजनक :- दारू पाजून नरेंद्र थेरे या शेतकऱ्यांच्या शेतजामीनीची बेकायदेशीर विक्री?

संतापजनक :- दारू पाजून नरेंद्र थेरे या शेतकऱ्यांच्या शेतजामीनीची बेकायदेशीर विक्री?

गोविंदा तेला ह्या व्यापाऱ्याने आपल्या सहकारी दलालांना पकडून थेरेची जमीन हडपली ? पत्नीची पोलिसात तक्रार.

भद्रावती प्रतिनिधी :-

पैशांचे लालच देऊन दारूच्या व्यसनी गेलेल्या शेतकऱ्यांची किंव्हा संकटात सपदलेल्या शेतकऱ्यांची जमीन कमी दरात विकत घेणाऱ्या सावकारांच्या अनेक चुरस कथा आपण ऐकल्या असेल पण दारूच्या नसेत एखाद्या शेतकऱ्याचे अपहरण करून त्यांचे बनावट कागदपत्र बनवून जमीन हडपण्याचे छडयंत्र करणारी टोळी भद्रावती तालुक्यातील नंदोरी येथे घडल्याने शेतकऱ्यामधे मोठा संताप व्यक्त केला जात आहे.

प्राप्त माहितीनुसार नंदोरी गावातील नरेंद्र लटारी थेरे याला दारुची अतोनात सवय असल्याने त्याचे घर संसारात लक्ष नव्हते. त्यामुळे त्यांची पत्नी नाईलाजास्वत तिचे माहेरी तिचे वडीलांकडे सेलू येथे राहत आहे. दरम्यान नरेंद्र थेरे यांची वडीलोपार्जीत मालकीची शेतजमीन मौजा डोंगरगांव (खडी), ता. भद्रावती, जि. चंद्रपुर येथे भु. क. ७६/२, आराजी १.८९ हे. आर शेतजमीन असुन सदरची शेतजमीन नरेंद्र व विनोद लटारी थेरे यांच्या नावाने सयुक्तपणे दर्ज आहे. यामध्ये शेतजमीनीत नरेंद्र थेरे यांच्या नावाने ०. ९४ हे. आर हिस्सा असुन नरेंद्र ला दारुचे अनोनात व्यसन असल्याने त्याचा फायदा घेऊन गोविंदा तेला यांनी शशिकांत विरूटकर, नरेश मांडवकर, शंकर अडूर यांच्या मदतीने नरेंद्र थेरे याला दि. २१/०२/२०२२ रोजी नंदोरी बु. फाटयावरुन वरोरा येथे दारु पिण्यासाठी आणले व त्याचे एच. डी. एफ. सी. बैंक वरोरा येथे खाते क्र. ५०१००४९१४९२४२१ हे बचत खाते काढले व बैंक पासबुक, ए. टी. एम. व चेकबुक काढून ते शशिकांत विरुटकर यांच्याकडे ठेवले व शंकर अडूर यांनी नरेंद्र थेरे यांचे दारूच्या नशेत असताना अपहरण करून फोर व्हीलर गाडीतून फिरवीले. दि. २१/०२/२०२२ रोजी वरोरा येथे विक्री दस्त तयार केला व गोविंदा तेला यांनी दि. २१/०२/२०२२ रोजी पासून दि. २६/०२/२०२२ पावेतो नरेंद्र थेरे याला भारत लॉज वरोरा येथे बंदीस्त करुन ठेवले व दि. २१/०२/२०२२ रोजी वरोरा येथील भारत लॉजवरुन फोर व्हीलरने भद्रावती येथे नेवून सदर शेताचा कोणताही मोबदला न देता दारुच्या नशेत वडीलोपार्जीत शेताची विक्री गोविंदा तेला यांनी स्वतःचे नावाने केली

गोविंदा तेला यांनी शशिकांत विरूटकर, नरेश मांडवकर, शंकर अडूर यांच्या मदतीने दारूच्या नशेत असणाऱ्या नरेंद्र थेरे या शेतकऱ्यांची शेत जमीन हडप ली असल्याने त्यांची पत्नी साधना थेरे यांनी वरोरा पोलीस स्टेशन मधे करून त्यांच्यावर सावकारी कायद्यांतर्गत व फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. मात्र पोलिसांनी अजुनपर्यत कुणावरही कारवाई केली नसल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here