Home चंद्रपूर पंचनामा :- एसीसी सिमेंट कंपनीच्या कोसारा येथे सापडलेल्या बैगा “एस राज” कंत्राटदार...

पंचनामा :- एसीसी सिमेंट कंपनीच्या कोसारा येथे सापडलेल्या बैगा “एस राज” कंत्राटदार कंपनीच्या ?

कंपनीच्या अधिकाऱ्यांसह त्या कंत्राटदारावर सिमेंट चोरीचा गुन्हा दाखल करण्याची मनसेची मागणी.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

एसीसी कंपनीचा बहुचर्चित “नॉट फॉर रिसेल सिमेंट” घोटाळा सन 2018 मधे मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी समोर आणल्यानंतर त्या प्रकरणाची सिआयडी चौकशी झाली होती व काँग्रेस चे घुग्गुस शहर अध्यक्ष राजू रेड्डी यांना सिमेंट च्या या चोरी प्रकरणात अटक झाली होती. आता त्याच प्रकरणाची पुनरावृत्ती झाली असून चंद्रपूर तालुक्यातील कोसारा येथे आढळलेल्या नॉट फॉर रिसेल सिमेंट बैगा ह्या “एस राज” कंत्राटदाराच्या असल्याचे पोलीस तपासात आढळून आल्याने एसीसी कंपनीच्या संपूर्ण दोषी अधिकाऱ्यांसह त्या “एस राज” च्या कंत्राटदारावर सिमेंट चोरीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी चौकशी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

कोसारा येथे पोलिसांनी जप्त केलेल्या नॉट फॉर रिसेल सिमेंट च्या बैगा यावर कंपनीच्या कंत्राटदारांच्या नावाचे शिक्के मारलेले असते हे प्रथमदर्शनी कुणाच्याही लक्षात आले नाही, दरम्यान जप्तीत असलेल्या सिमेंट बैगा नेमक्या कुणाच्या? याबद्दल चौकशी अधिकारी गोंधळात असताना आता त्या बैगावर एस राज नावाच्या कंत्राटदाराचा शिक्का मारलेला असल्याने आता पोलिसांना आरोपी शोधण्यासाठी वेळ लागणार नाही पण लवकरात लवकर त्या कंत्राटदार आरोपी यांच्यासह संबंधित एसीसी सिमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांवर चोरीचा गुन्हा दाखल करा अशी मागणी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी चौकशी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक लांबट यांच्याकडे केली आहे. आता या प्रकरणात कोण कोण अडकणार ?याबद्दल चर्चेला उधाण आले असून पुन्हा परत सिआयडी चौकशी लागण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here