Home वरोरा डॉ.आंबेडकर शासकीय वसतिगृहातील माजी विद्यार्थ्यांचा रंगला ऐतेहसिक स्नेहमिलन सोहळा.

डॉ.आंबेडकर शासकीय वसतिगृहातील माजी विद्यार्थ्यांचा रंगला ऐतेहसिक स्नेहमिलन सोहळा.

https://youtube.com/shorts/heqLo3J9Dpg?feature=share

 

जुन्या आठवणींना उजाळा देत रंगली नाच गाण्यासह रंगतदार मैफिल. मित्रांनी केल्या आपापल्या भावना व्यक्त, पुढच्या वर्षी होणार पारिवारिकस्नेहमिलन सोहळा.

वरोरा प्रतिनिधी :-

विद्यार्थी दशेत असताना प्रत्तेकाचे एक स्वप्न असते की मला मोठा आधिकारी व्हायचंय, मला प्राध्यापक,अध्यापक इंजिनिअर,डॉक्टर व्हायचंय पण काही विद्यार्थी आपले हे स्वप्न पूर्ण करूं शकत नाही, कारण त्यांच्या त्या वेळेच्या परिस्थितीवर सुद्धा खूप काही अवलंबून आहे, त्यातच आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने अनेक विद्यार्थी परिस्थितिसमोर हतबल होतात व आपली उद्दिष्टपूर्ती करूं शकत नाही पण अशाही परिस्थितीवर मात करून जे विद्यार्थी आपले ध्येय गाठतात तेच खरे समाजाला प्रेरणा देत असतात अशा काही मित्रांसह वरोरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहातील सन 1990 ते 1997 या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा ऐतेहसिक स्नेहमिलन सोहळा वरोरा तालुक्यातील फ़त्तेपुर स्थित शिवाजी मंदिरातील शेडमधे आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहाचे माजी विद्यार्थी तथा जि. प. शाळेचे मुख्याध्यापक दिवंगत दिलीप वाघ. बीएसएफ चे जवान दिवंगत राजेश आत्राम यांना सर्व मित्रांनी श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. या स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन रेल्वे पोलीस मधे कार्यरत शामसुंदर सिडाम यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यापक नरहरी बनसोड,धनराज रेवतकर, अरविंद विटाळे, गजानन गुजरकर अनिल गेडाम इत्यादींच्या नेत्रुत्वात करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित सर्व मित्रांनी जुन्या आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले. काही मित्रांचा आजवरचा प्रवास फारच प्रेरणादायी होता तर काही मित्रांनी आपल्या भावना व्यक्त करतांना अक्षरशः डोळ्यात अश्रू आणले, यावेळी जणू सगळे मित्र एक परिवार आहे आणि एकमेकांपासून आपण दूर जाऊ शकत नाही असे भावनिक वातावरण सगळ्यांच्याच मनाला भावविभोर करत होते. जीवनाचा खरा आनंद मित्रांच्या भेटीत असतो आणि नातेवाईकांपेक्षा मित्र हा आपल्या जीवनातील आधारस्तंभ असतो अशा भावना सगळ्या मित्रांनी बोलून दाखवल्या,यामध्ये कोरोना च्या काळात मित्रांनी मित्रांना कशी साथ दिली व संकटाच्या काळात मित्र कसा भावासारखा धावुन आला यांचे किस्से सांगितल्या गेले, त्यातच साप्ताहिक भूमिपूत्राची हाक चे संपादक राजू कुकडे यांनी “दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामधे गारव्या सारखा. . . ” हे गाणं सादर करून उपस्थित सर्व मित्रांना आपुलकिच्या धाग्यात गुंफण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमात सर्व मित्रांनी वसतिगृहातील चिर्चित किस्से सांगून हशा पिकवला तर काहींनी वसतिगृहातील धन्या,बाळ्या इत्यादी टोपण नावांच्या चारोळ्या केल्या. यावेळी संगीताच्या तालावर सर्व मित्रांनी गोंधळ घालणारे न्रुत्य करून कार्यक्रमाचा आनंद घेतला व या कार्यक्रमात त्यांनी आनंदाचे शिखर गाठले. विशेष म्हणजे एवढ्या वर्षांनी एकत्र आलेल्या मित्रांनीपुढच्या वर्षी पारिवारिकस्नेहमिलन सोहळा घेण्याचा ठराव केला.

मित्रांच्या या अनोख्या स्नेहमिलन सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून राजू कुकडे तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद देवाडा( बु ) चे मुख्याध्यापक पदवीधर (विषय शिक्षक) तथा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शंकर आत्राम.रेल्वे पोलीस शामसुंदर सिडाम, चंदनवार कोचिंग क्लासेस चे संचालक योगानंद चंदनवार, रेल्वेचे चालक माणिक तोडासे, ग्रामविकास अधिकारी मोरेश्वर कोमटी, प्रमोद नौकरकर, इंजिनिअर सतनाम सिंह भौड इत्यादींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनराज रेवतकर यांनी केले, प्रास्ताविक नरहरी बनसोड यांनी तर आभार प्रदर्शन विनोद आत्राम यांनी केले, यावेळी गजानन गुजरकर, अरविंद विटाळे, अनिल गेडाम, संदीप मेश्राम,दादा येरकाडे,दिलीप येटे,विकास कुलसंगे,साधू घुगरे, ज्ञानेश्वर आत्राम, रंजय नागदेवते,प्रमोद नौकरकर, रामचंद्र मेश्राम, रंगनाथ मत्ते, विठ्ठल मेश्राम. बाळा चंदनवार इत्यादीं मित्रांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here