Home चंद्रपूर दुःखद :- महाराष्ट्राच्या पत्रकारिता जगतातील धारदार लेखणीचा बादशहा हरपला.

दुःखद :- महाराष्ट्राच्या पत्रकारिता जगतातील धारदार लेखणीचा बादशहा हरपला.

ज्येष्ठ पत्रकार सुरेश धोपटे यांच्या दुःखद निधनाने पत्रकारिता जगतात शोककळा!

चंद्रपूर प्रतिनिधी :-

केवळ चंद्रपूर जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे प्रखर वक्ते तथा दैनिक मराठा चे संपादक आचार्य अत्रे यांच्यासोबत पत्रकारिता करणारे व आयुष्याची 40 वर्षे चंद्रपुरात निर्भीड पत्रकारिता करून पत्रकारिता क्षेत्रात बादशाही स्थापन करणारे जेष्ठ पत्रकार सुरेश धोपटे यांचे आज दुपारी दीर्घकालीन आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील पत्रकारिता जगतात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर वर्धा येथे अंत्यसंस्कार उद्या सकाळी 11. 00 च्या दरम्यान होणार असल्याची माहिती आहे.

चंद्रपुरात साप्ताहिक “चंद्रपूर पत्रिका” या वर्तमानपत्रातून आपल्या धारदार लेखणीने त्यांनी दरारा निर्माण केला होता त्या सुरेश बाळकृष्ण धोपटे यांचे आज २५ मे रोजी वयाच्या 77 व्या वर्षी दुपारी 12 वाजता दिर्घ आजाराने दुःखद निधन झाले. वडसा देसाईगंज येथील मथुरा बलात्कार कांड, मथुरा यांचे पती आरोपी असलेले दोन शिपाई यांची प्रत्यक्ष भेट, यावर आधारित सचित्र स्टोरी देशात सर्वप्रथम आनंद बाजार पत्रिका प्रकाशन कलकत्ता तर्फे स्व. जनार्दन ठाकुर संपादक असलेल्या संडे मिड-डे मध्ये प्रकाशित केली. अशा अनेक शोध पत्रकारिता सुरेश धोपटे यांच्या नावे आहेत. दि हितवाद, फ्री प्रेस जर्नल, नवशक्ती, नागपूर टाईम्स, नया उर्दू समाचार, जनवाद, सामना या दैनिकांने समाचार भारती, वृत्तसंस्था आणि साप्ताहिक ब्लिट्झ, करंट, श्री, रणांगण, न्युज ट्रॅक इत्यादी साठी चंद्रपूर- गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केले. पाच दशकांपेक्षा अधिक काळ वृत्तपत्रसृष्टीत कार्यरत राहिलेले ज्येष्ठ पत्रकार सुरेश बाळकृष्णराव धोपटे यांनी आपल्या पत्रकारितेचे पस्तीस वर्षाच्या जवळपास काळ त्यांनी चंद्रपूरात काढला.

त्यांच्या निर्भिड व निष्पक्ष लेखनामुळे त्यांनी चंद्रपूरात एक प्रकारची बादशही तयार केली होती. जो होगा देखा जायेगा अशी सडेतोड पत्रकारिता करणारे सुरेश धोपटे यांचे आज दुपारी 12 वाजता दरम्यान हिंदनगर स्थित राहत्या घरी निधन झाले. दैनिक सकाळ चे माजी जिल्हा प्रतिनिधी पत्रकार प्रवीण धोपटे यांचे ते वडील होत. वर्धा, चंद्रपूर, नागपूर आणि मुंबई येथे त्यांनी पत्रकारिता केली. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुली मेघा व निशा, मुलगा प्रविण, जावई, स्नुषा. नातवंडे आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या निधनाने वृत्तपत्रसृष्टीत शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here