Home चंद्रपूर क्राईम डायरी :- मनसेच्या पुढाकाराने कलकामच्या विदेश रामटेकेला अटक तर इतर संचालकांचा...

क्राईम डायरी :- मनसेच्या पुढाकाराने कलकामच्या विदेश रामटेकेला अटक तर इतर संचालकांचा शोध सुरू.

कंपनीच्या संचालकांना अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक मुंबई ला होणार रवाना.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

कलकाम कंपनीच्या गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांनी फसवणूक करणारे कंपनीचे संचालक व त्यांचे प्रतिनिधी यांच्या विरोधात चंद्रपूर जिल्ह्यातील कंपनीचे एजंट व गुंतवणूकदार यांनी चांदा ते बांदा अशी लढाई सुरू केल्यानंतर मुंबई ला कंपनीच्या संचालकांना भेटण्यासाठी गेलेल्या एजंट व गुंतवणूकदारांना अक्षरशः मुंबई च्या संचालकांनी धुडकावून लावले. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुंबई पदाधिकाऱ्यांनी कलकाम कंपनीच्या या एजंट व गुंतवणूकदरांना सहकार्य केले व कंपनीच्या संचालकांना मुंबई तून शोधण्याचा प्रयत्न केला पण कंपनीच्या मुख्य कार्यालयाला कुलूप असल्याने व हे कार्यालय इतरत्र हलविल्याचे बोलले जातं असल्याने त्यांना नाईलाजास्तव आता चंद्रपूर जिल्ह्यात पोलीस तक्रार करून संचालकांवर गुंतवणूकदार संरक्षण अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याचा सल्ला दिला गेला व यासाठी चंद्रपूर जिल्ह्य़ातील पदाधिकारी सहकार्य करतील असे मुंबई च्या मनसे पदाधिकारी यांनी सांगितले. जानेवारी 2022 ला मुंबई येथे सुरू झालेला हा लढा शेवटी चंद्रपूर मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्या पुढाकाराने सुरू झाला व 21 एप्रिल ला जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली त्यांनतर ही तकार आर्थिक गुन्हे शाखा यांच्याकडे वर्ग करण्यात आली व कलकाम कंपनीच्या सर्व संचालकांवर व त्यांच्या प्रमुख प्रतिनिधी यांच्याविरोधात पोलिसांनी एमपीआयडी कायद्यांअंतर्गत गुन्हे दाखल केल्यानंतर कंपनीचे विदर्भ प्रमुख विदेश रामटेके यांना पोलिसांनी अटक केली तर कंपनीचे
स्थानिक प्रतिनिधी विजय येरगुडे हे पसार झाले आहे. आता कंपनीच्या सर्व संचालकांचा व आरोपी प्रतिनिधी यांना अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक शोध मोहीम राबविणार आहे.

कलकाम कंपनीच्या संचालकांनी त्यांच्या एजंट व गुंतवणूकदारांना पैसे परत केले नसल्याने मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्या पुढाकाराने दिनांक 21 एप्रिल 2022 ला पत्रकार परिषद घेऊन एजंट व गुंतवणूकदार यांनी पोलीस अधीक्षक साळवे यांच्याकडे रितसर तकार दिली व कंपनीच्या संचालक व त्यांना साथ देणाऱ्या सर्वांवर (एमपीआयडी) गुंतवणुकदार संरक्षण अधिनियम 1999 या कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती मात्र कंपनीचे विदर्भ प्रमुख असलेले विदेश रामटेके यांनी भरत गुप्ता व प्रतिमा ठाकूर यांच्या मदतीने गुंतवणुकदाराना भुलथपा देऊन पत्रकार परिषद घेतली व मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्यावर 20 लाख मागितल्याचा खोटा आरोप केला आणि कंपनीच्या संचालकांविरोधात एजंट व गुंतवणूकदार यांनी खोटी तक्रार दिल्याचा पण आरोप केला. यावरून कंपनीच्या संचालकांचा भरत गुप्ता व प्रतिमा ठाकूर हे बचाव करत आहे हे सिद्ध होते त्यामुळे या दोघांवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी कंपनीचे एजंट व गुंतवणूकदार करत आहे.

या संदर्भात कलकाम कंपनीचे एजंट व गुंतवणूकदार यांनी आर्थिक गुन्हे शाखा प्रमुख सहायक पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन कलकाम कंपनी व्यतिरिक्त विदेश रामटेके व विजय येरगुडे यांनी तनिक्शा व कलावती या दोन कंपन्यात सुद्धा पैसा गुंतवणूक करायला लावला असून त्या कंपन्यांत सुद्धा गुंतवणूकदारांचा गुंतला असल्याची माहिती दिली त्यावरून आता दुसरा गुन्हा सुद्धा कलकाम च्या संचालकांवर होणार असल्याचे संकेत मिळत आहे. आता कंपनीच्या एजंट व गुंतवणूकदार यांचा हा लढा मनसेच्या माध्यमातून मुंबई पर्यंत लढला जाणार असून सर्व संचालकांवर व त्यांना साथ देणाऱ्या गुंडावर गुन्हे दाखल होऊन त्यांची चल अचल संपती जप्त होणार आहे त्यामुळे कंपनीच्या सर्व एजंट व गुंतवणूकदार यांनी एकजूट राहून या लढ्याला बळकट करावे असे आवाहन मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी केले आहे.

Previous articleदुःखद :- महाराष्ट्राच्या पत्रकारिता जगतातील धारदार लेखणीचा बादशहा हरपला.
Next articleखळबळजनक :- भद्रावती तहसीलदार सोनवणे यांच्यावर रेती माफियांचा प्राणघातक हल्ला ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here