Home क्राईम स्टोरी खळबळजनक :- भद्रावती तहसीलदार सोनवणे यांच्यावर रेती माफियांचा प्राणघातक हल्ला ?

खळबळजनक :- भद्रावती तहसीलदार सोनवणे यांच्यावर रेती माफियांचा प्राणघातक हल्ला ?

रेती चोरी पकडण्यासाठी गेलेल्या तहसीलदार सोनवणे यांच्या गाडीला ट्रॅक्टरची जोरदार धडक.

भद्रावती ता. प्रतिनिधी :

जिल्ह्यात रेतीचे घाट लिलाव झाले असले तरी रेती चोरिच्या घटना थांबता थांबत नाही कारण फुकटात मिळत असलेली बिना रॉयल्टी ची रेती चोरी ही मोठा फायदा मिळवून देणारी आहे आणि म्हणूनच रेती माफियांनी जे घाट लिलाव झाले नाही त्या घाटातून नाल्यातून रेती काढून लाखों रुपयांची रेती चोरी चालवलेली असल्याने भद्रावती चे तहसीलदार डॉ. अनिकेत सोनवणे यांच्या नेतृत्वात चंदनखेडा परिसरात रेती चोरीची माहिती कळताच त्यांनी त्या रेती चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता भागवत नावाच्या ट्रॅक्टर चालक मालक यांनी कुठलीही पर्वा न करता तहसीलदार यांच्या गाडीला मागून जोरदार धडक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला यात गाडी जवळपास 20 फुटांपेक्षा जास्त दूर फेकल्या गेली मायर सुदैवाने तहसीलदार यांच्या गाडीला थोडी मोडतोड झाली पण ट्रॅक्टर मात्र पलटी झाला सदर गंभीर प्रकरणाची दखल घेत भद्रावती व शेगांव पोलीस स्टेशन चे पोलीस घटनांस्थळी पोहचले व आरोपीला ताब्यात घेतले. दरम्यान 307 व 353 सारखे गंभीर गुन्हे आरोपी वर लावण्याचा अंदाज आहे.

वरोरा भद्रावती तालुक्यातील रेती माफियांचा कर्दनकाळ ठरलेले सहाय्यक पोलीस अधीक्षक नोपाणी यांच्याकडून या प्रकरणाची कशी चौकशी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून आता रेती माफियांचा बंदोबस्त निश्चितपणे होईल अशी अपेक्षा आहे !

Previous articleक्राईम डायरी :- मनसेच्या पुढाकाराने कलकामच्या विदेश रामटेकेला अटक तर इतर संचालकांचा शोध सुरू.
Next articleसंतापजनक :- खाबांडा येथील पशुवैद्यकिय दवाखाना सलाईनवर? पशुधन पालक संतापले ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here