Home वरोरा संतापजनक :- खाबांडा येथील पशुवैद्यकिय दवाखाना सलाईनवर? पशुधन पालक संतापले ?

संतापजनक :- खाबांडा येथील पशुवैद्यकिय दवाखाना सलाईनवर? पशुधन पालक संतापले ?

गेल्या अनेक दिवसापासुन पशुधन वैधकिय अधिकारी गायब ? शासन प्रशासनाचे उदासीन धोरण ठरत आहे पशूंचे मरण.

खाबाडा
मनोहर खिरटकर

ग्रामीण भागातील पशुपालकाना त्यांच्या पशुवर वेळीच उपचाराची सोय व्हावी म्हणून शासनाने पशुवैद्यकिय दवाखाने सुरु केले. मात्र वरोरा तालुक्यातील खांबाडा येथील पशुवैद्यकिय दवाखान्यात मागील अनेक दिवसापासुन वैद्यकिय अधिकारी गायब असून तो दवाखानाच सलाईन वर असल्याचा प्रकार दिसत आहे आता ते पद कधी भरणार व या परिसरातील शेतकऱ्यांना मदतकशी काय होईल याबद्दल संभ्रम असून या भागातील शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप व्यक्त होत आहे.

खांबाडा येथील पशुवैद्यकीय दवाखाना आता शोभेची वस्तू बनली असून इथे चक्क डॉक्टर च नाही तर औषधाचा सुद्धा अभाव आहे. येथे पुर्वी पशुधन वैधकिय अधिकारी म्हणून नागले नामक अधिकारी होते पण त्यांची बदली झाल्याने येथील पशुवैद्यकिय दवाखान्याचा प्रभार टेमुर्डा येथे कार्यरत असणारे वैद्यकिय अधिकारी पोफडे यांचे कडे देण्यात आला मात्र आठवड्यातील केवळ एक किंवा दोन दिवस ते या ठिकाणी येतात पण कोणत्याच पशुवर उपचार करीत नाही व पशुपालकांना उलट उत्तरे देतात तथा मी वैद्यकीय अधिकारी नाही पंचायत समीतीचे विस्तार अधिकारी यांना बोलवा व उपचार करून घ्या त्यामुळे पशुधनपालकांना निराश होवून खाजगी वैद्यकीय डाँक्टरकडून उपचार करून घ्यावा लागत आहे,

खांबाडा अंतर्गत अनेक गावे येतात बाहेरगावून येणारे पशुपालक येथील दवाखान्यात येतात पंरतु येथे वैद्यकीय अधिकारीच उपस्थित राहत नसल्याने या ठिकाणी सर्व पशुपालकांची गैरसोय होत आहेत व पशुवर वेळीच उपचार होत नसल्याने कित्येक जनावरे दगावली सुद्धा आहे असाच काहिसा प्रकार खांबाडा येथे घडला दिनाक 28/5/2022ला घडला असून शंकर तानबाजी चुटे यांचे दोन्ही l बैल गोठ्यात बांधले असता त्यातील एका बैलाला साप चावला हे पशुपालकाच्या लक्षात येताच त्यानी दवाखान्याकडे धाव घेतली पण तेथे वैद्यकिय अधिकारी नसल्याने त्याच्या बैलावर वेळीच उपचार झाला नसल्याने तो बैल दगावला. ऐन पेरणीच्या हंगामात बैल दगावल्याची माहिती सकाळी फोनवरून प्रभारी असलेले पशुधन वैधकिय अधिकारी पोफडे यांना दिली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे देत तुम्ही मला सांगु नका पंचायत समितीचे पशुधन विस्तार अधिकारी नेवारे व शेंदरे यांना माहिती द्या त्यांनतर ते मला फोन करेल व मी समोरील कार्यवाही करेन अन्यथा मी करणार नाही असे हेकेखोर उत्तरे दिली वास्तविक हि सर्व माहिती त्यांनी आपल्या अधिकार्याना देणे गरजेचे असताना त्यांनी मात्र अशी उलट उत्तरे देणे कितपत योग्य आहे ?त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर कारवाई च व्हायला हवी कारण जर एक जबाबदार अधिकारी असे उत्तर देत असेल तर वरिष्ठांनी यांची वेळीच दखल घेणे आवश्यक आहे.

खाबांडा येथे लाखो रूपये खर्च करून शासनाने पशुवैद्यकिय दवाखान्याची सोय केली व मोठी इमारत बांधली जेणेकरून येथे वैद्यकीय अधिकारी पशुपालकाच्या चोविस तास सेवेत रहावा असे शासनाचे आदेश सुध्दा आहे तरीदेखील येथे वैद्यकीय अधिकारी निवासी रहात नाही म्हणजेच शासनाच्या आदेशाला जणु केराची टोपली दाखवत असताना वरीष्ठ अधिकारी तथा राजकिय पुढारी गप्प का?राजकीय पुढारी साखर झोपेत आहे का ?असे एक ना अनेक प्रश्न सर्वसामान्य नागरीकाना पडत आहे सोबतच शासनाच्या या उदासीन धोरणामुळेच पशुपालकांना खाजगी वैद्यकीय डाँक्टरकडून मदत घ्यावी लागते परिणामी गोरगरीब पशुपालकांना आर्थीक भुर्दड सहन करावा लागत आहेत.

____________________________
येथे वैद्यकीय अधिकारी निवासी रहात नसल्याने माझा बैल दगावला यासाठी मला शासन मदत करणार का? जर वैद्यकीय अधिकारी निवासी असता तर कदाचित वेळीच उपचार करता आला असता. आता शेतीचा हंगामाला सुरूवात होणार तेव्हा मी शेती कशी कसणार ? असा प्रश्न खांबाडा येथील पिडीत शेतकरी शंकर चुटे यांनी प्रशासनाला केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here