Home चंद्रपूर एसीसी सिमेंटच्या “नॉट फॉर सेल सिमेंट बैगा चोरी प्रकरणात कंपनीच्या अधिकाऱ्यांवर प्रथम...

एसीसी सिमेंटच्या “नॉट फॉर सेल सिमेंट बैगा चोरी प्रकरणात कंपनीच्या अधिकाऱ्यांवर प्रथम कारवाई करा.

शिक्का मारलेली नवीन खाली असलेली सिमेंट बैग राजू रेड्डी च्या कार्यालयात कशी ? शासनाचा महसूल बुडविण्याचा धक्कादायक प्रकार उघड.

चंद्रपूर प्रतिनिधी  :-

घुग्गुस नकोडा येथील एसीसी सिमेंट कंपनीच्या नॉट फॉर सेल सिमेंट च्या बैगा ह्या खाजगी घर बांधकामाकरिता सर्हासपने विकल्या जातं असल्याच्या अनेक घटना समोर येत आहे, मात्र कंपनीचे अधिकारी यांची कंत्राटदार व संबंधित चोरट्यांशी आर्थिक संबंध असल्याशिवाय व साठगांठ असल्याखेरीज कंपनीच्या बाहेर सिमेंट विकल्या जाणे शक्य नाही, त्यामुळे या सिमेंट चोरी प्रकरणात कंपनीचे ते कोण अधिकारी आहेत जे कंत्राटदार यांच्याशी संगनमत करून कंपनीचे नॉट फॉर रिसेल सिमेंट खुल्या बाजारात विकतात याचा छडा पोलिसांनी लावला  तर असली चेहरे नक्कीच समोर येतील त्यामुळे पोलिसांनी अगोदर एसीसी सिमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांची चौकशी करून यांच्यावर गुन्हे दाखल करावे  त्यासोबत दोषी कंत्राटदार राजू रेड्डी यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करावी अन्यथा न्यायालयातूनआम्ही संबंधितांवर गुन्हे दाखल करूं असा इशारा मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलीस प्रशासनाला दिला आहे.

मागील साडेतीन वर्षांपूर्वी म्हणजे दिनांक 5/12/2018 ला घुग्गुस येथे एका घराच्या बांधकाम स्थळी नॉट फॉर रिसेल सिमेंट च्या जवळपास 200 सिमेंट बैगा आढळल्या होत्या व त्या प्रकरणी तिघांवर गुन्हे दाखल होऊन एसीसी कंत्राटदार राजू रेड्डी यांना या प्रकरणी अटक झाली होती या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदन देऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती हे विशेष. आता परत त्याच घटनेची पुनरावर्ती झाली असून कंपनीच्या अधिकाऱ्यांशी साठगांठ करून राजू रेड्डी यांनी एसीसी सिमेंट कंपनीच्या नॉट फॉर रिसेल बैगा खुल्या बाजारात विकण्याचा सपाटा लावल्याने या प्रकरणी रामनगर पोलिसांनी कोसारा गावाजवळ असलेल्या घर बांधकाम ठिकाणी जवळपास 22 नॉट फॉर रिसेल सिमेंट बैगा जप्त करून कंपनी च्या अधिकाऱ्याना पत्र दिले मात्र कंपनीचे अधिकारी यांनी या संदर्भात पोलिसांना मदत केली नाही असे कळते. दरम्यान त्या सिमेंट बैगावर एस राज लिहिले असून ती कंत्राटी कंपनी राजू रेड्डी ची आहे हे शिद्ध होत असल्याने राजू रेड्डी यांच्या विरोधात कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांत कां तकार दिली नाही यांचे आश्चर्य वाटत असल्याचे पत्रकार परिषदेत राजू कुकडे यांनी म्हटले आहे.

एसीसी सिमेंट कंपनी ची शिक्के असलेली नवीन कोरी खाली बैगा राजू रेड्डी कडे कशी ?

ज्याअर्थी एसीसी सिमेंट कंपनीचे नॉट फॉर रिसेल सिमेंट कोसारा येथे मिळाले व ते पोलिसांनी जप्त केले त्यापैकी एका बैगावर एस राज हे नाव स्पष्ट दिसत होते त्यावरून ह्या नॉट फॉर सिमेंट च्या बैगा ह्या राजू रेड्डी यांच्याच होत्या हे स्पष्ट झाले दरम्यान एकाच बैगावर एस राज कसे ?हा प्रश्न उपस्थित करून राजू रेड्डी यांनी एसीसी कंपनीतून नवीन कोरी शिक्के मारलेली बैग स्वतःच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दाखवली ती आली कुठून ? कां अशा नवीन कोऱ्या नॉट फॉर रिसेल सिमेंट बैगा कंपनी कंत्राटदार यांना मोफत देतात असा प्रश्न करून या प्रकरणी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी राजू रेड्डी यांचे सूत जुळले असल्याने राजू रेड्डी ला वाचविण्यासाठी कंपनीचे अधिकारी प्रयन्त करीत असल्याचा गंभीर आरोप सुद्धा राजू कुकडे यांनी पत्रकार परिषदेत केला असून जर पोलिसांनी एसीसी सिमेंट कंपनीच्या अधिकारी व कंत्राटदार राजू रेड्डी यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई केली नाही तर न्यायालयातून या प्रकरणी एसीसी सिमेंट कंपनीचे अधिकारी व कंत्राटदार राजू रेड्डी यांच्यावर गुन्हे दाखल करूं असा इशारा पण राजू कुकडे यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here